Health

१० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा

देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती.

Politics

आचारसंहिता नक्की काय आहे भाऊ ?

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते.

लोकसभा निवडणूक म्हणजे काय ? मतदानाचे काय आहे महत्त्व ?

देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून...

Entertainment

Business

पहिल्यांदा IT Return भरताय? मग जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया?

तुम्ही भरलेल्या टॅक्सची आणि तुमच्या टॅक्समधून डिडक्ट(कपात) केलेल्या टॅक्स संदर्भातील संपूर्ण माहिती असणारे हे एक दस्तऐवज (डॉक्युमेंट) आहे. सदर फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन डाउनलोड करता येतो. ITR फाईल करताना हा फॉर्म विचारात घेणे खूप आवश्यक आहे. यामध्ये TDS कपातीपासून टॅक्स रिफंड , ॲडव्हान्स टॅक्स पर्यंतची सगळी माहिती उपलब्ध असते.
[td_block_social_counter custom_title=”Stay Connected” facebook=”desidoka” twitter=”desidoka” youtube=”#” style=”style4 td-social-colored” f_header_font_transform=”uppercase” manual_count_youtube=”61453″ instagram=”desidoka” pinterest=”desidoka”]

Make it modern

India

आचारसंहिता नक्की काय आहे भाऊ ?

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते.

Education

शिक्षक दिन का साजरा केला जातो? काय आहे त्यामागील इतिहास?

कोणत्याही समाजाचे किंवा देशाचे चांगले भविष्य घडवणे ही त्या देशातील शिक्षकांची जबाबदारी आहे. त्या देशातील नागरिकांना यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग दाखवण्याचे काम ते करतात. यासोबतच ते बरोबर आणि चुकीची चाचणी कशी करायची तेही सांगतात. अशा रीतीने माणसाच्या पहिल्या गुरूला त्याची आई म्हणतात, तर गुरू त्याला ऐहिक अनुभूती मिळविण्यासाठी म्हणजेच जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. शिक्षकाचे हे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

यंदा सुट्टीला वाट पाहावी लागणार: एप्रिलअखेर होणार परीक्षा;उन्हाळी सुट्टी मे आणि जूनमध्ये असणार

पहिली ते आठवी-नववीच्या अनेक परीक्षा पूर्ण होत असतानाच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नव्या आदेशामुळे शाळांना मिळणारी उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडणार आहे. तर उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली नसून त्या सुट्ट्या मे आणि जूनमध्ये असणार आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला नाही त्याच शाळा सुरू राहतील, असंही मांढरे यावेळी म्हणालेत. यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय.

SSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सुरु झाली आहे तर उद्यापासून म्हणजेच १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती बोर्डाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या शाळांमध्ये उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत.

सुप्रिम कोर्टाचा निर्णय; दहावी आणि बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.ऑफलाईन परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार; परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यातील वाढत्या कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. असेही सामंत यांनी सांगितले.

Finance

भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑफलाइन डिजीटल पेमेंट्सबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता गावांमध्ये आणि दुर्गम भागांत डिजिटल व्यवहार ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. ऑफलाइन पेमेंटनुसार सध्या 200 रुपयांच्या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली आहे. इंटरनेटशिवायही पेमेंट करता यावे यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीच हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या वर्षी 6 ऑगस्ट, 2021 रोजी रिझर्व्ह बँकेने ऑफलाईन मोडमध्ये डिजीटल पेमेंटसंबंधित एका प्राथमिक योजनेला मंजुरी दिली होती. ज्यात ऑफलाईन किंवा इंटरनेटशिवाय डिजीटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी नवी पावले उचलली जात आहेत.

Sports

Technology

Festival