महिला टी-20 विश्वचषक : पावसाने इंग्लडला हरवले; भारतीय संघाचा फायनलमध्ये प्रवेश

0
524

आज महिला टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. सिडनी मैदानावर सकाळापासून पावसाची हजेरी होती. यामुळे भारतीय संघाने ग्रुप फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. आयसीसीच्या नियमानुसार- सामना रद्द झाल्यामुळे भारतीय टीम आपल्या ग्रुपमध्ये टॉप वर असल्यामुळे अंतिम फेरीत धडक मारली आहे. ग्रुप-एमध्ये भारताने सर्व 4 सामने जिंकले आहेत. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते.
भारतीय महिला संघाची आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारत २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता. गेल्या म्हणजे २०१८च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.

भारतीय महिला संघ पहिल्यादांच फायनलमध्ये
आतापर्यंत सहा महिला विश्वचषक झाले आहेत. भारतीय संघाला यापूर्वी एकदाही फायनलमध्ये धडक मारता आली नव्हती. तीन वेळेस भारतीय संघाने 2009, 2010, 2018 मध्ये सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. तर, ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त 4 वेळा विश्वचषक जिंकला आहे. सध्याच्या भारतीय संघाची कामगिरी पाहता भारताला यंदा विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.

आजच होणार दुसरी सेमीफायनल
दुसरा सेमीफाइनल दक्षिण आफ्रीका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज दुपारी 1.30 वाजता याच मैदानावर खेळवला जाणार आहे. जर हा सामनादेखील रद्द झाल्यास, गुणानुसार दक्षिण आफ्रीका फायनलमध्ये पोहचेल. अशा परिस्थिती 8 मार्चला मेलबर्नमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रीकेदरम्यान फायलन होऊ शकतो.

भारतीय वेळेनुसार आठ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता अंतिम सामन्याला सुरूवात होईल.