Maharashtra Budget : आले रे आले अर्थसकंल्प आले

0
507

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या घोषणा केल्या. शेती, जलसिंचन, पर्यटन, युवक कल्याण, उद्योग यावर अधिक भर अर्थसंकल्पामध्ये देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

  • अर्थसंकल्पाचे हे आहेत महत्त्वाचे मुद्दे :-
  • घर स्वस्त होतील… सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत जाहीर केली. याने मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत
  • दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, वरील रक्कम भरल्यानंतर सरकार २ लाखांचं कर्ज माफ करणार, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा
  • नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीयपंथांसाठी मंडळ स्थापन करण्यात येणारआहे. यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
  • गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह विविध स्मारकांसाठी निधी, धार्मिक स्थळांच्या विकासासाठीही निधीची तरतूद
  • स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही, ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा
  • पुणे शहराबाहेर १७० कोटींचा रिंगरोड, १२०० कोटींचा निधी सरकारकडून, अजित पवारांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अभिनंदन
  • पुणे मेट्रोला गेल्या पाच वर्षात जेवढा निधी दिला त्यापेक्षा जास्त निधी या वर्षात दिला जाणार
  • पुण्यात ऑलिम्पिक भवन बांधले जाणार आहे. सोबतच, जिल्हानिहाय क्रीडा संकुलांसाठी केला जाणारा खर्च 8 कोटी रुपयांवरून वाढवून 25 कोटी रुपये केला जाणार आहे. बालेवाडी येथे नवीन विद्यापीठाची स्थापना करण्याची योजना
  • डॉक्टरांची कमी भरुन काढण्यासाठी सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करणार
  • महिला सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय सुरु करणार
  • गावोगावी नव्या कोऱ्या एसटी बसेस धावणार, महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बस बदलणार. १६०० नव्या बसची खरेदी होणार, गावोगावी वायफाययुक्त अत्याधुनिक बस धावणार
  • जिल्हा परिषदांच्या शाळांचाही दर्जा वाढवणार… सर्व शाळांना इंटरनेटनं जोडण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करणार.
  • ग्रामीण भागातील ४० हजार किमीची रस्त्याची कामे हातात घेऊन ती पूर्ण करण्याचं नियोजन
  • बहुजन कल्याण विकासासाठी अर्थसंकल्पात ३ हजार कोटी, सारथी योजनेसाठी ५० कोटींचा निधी
  • सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ, त्यासाठीही निधीची तरतूद
  • मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर पडणार, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन, पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागासाठी १ हजार ४०० कोटींचा निधी
  • शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार
  • ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानाची योजना आता संपूर्ण राज्यात राबवणार
  • मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार, वडाळ्यात वस्तू व सेवा कर भवनची उभारणी
  • आमदारांना निधीत वाढ, आता २ कोटींऐवजी ३ कोटींचा निधी मिळणार
  • राज्यात मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येणार , १० लाख नोकऱ्या