विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न हुकले; भारतीय महिलांचा पराभव

0
332

मेलबर्नच्या मैदानात महिला दिनाच्या दिवशी ऑस्ट्रलियन महिलांनी भारतीय महिलांचा ८५ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवत पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 185 धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघ फक्त 99 धावांची मजल मारू शकला.
भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याशिवाय वेदा कृष्मामूर्तीने १९, रुचा घोषने १८, स्मृती मंधाना ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने चार आणि जेस जोनासनने तीन तर सोफी मोलिन्यूक्स, डेलिसा किमिंस आणि निकोला कॅरीने एक-एक विकेट घेतली. विश्वचषकामध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करणारी युवा खेळाडू शेफाली वर्मा फक्त 2 धावांवर आउट झाली.
यापूर्वी 6 वेळेस टी-20 वर्ल्ड कप झाला आहे, ही 7वी वेळ होती. भारताने आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर आपले नाव कोरले नाही. तर, ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त 5 वेळेस विश्वचषक जिंकला आहे.

आणि शेफाली वर्माला रडू लागली …..

महिला टी-२० स्पर्धेत ज्या शेफालीवर भारताची भिस्त होती ती फायनलमध्ये संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकली नाही. मोक्याच्या क्षणी ऐतिहासिक सामन्यामध्ये पराभव झाल्याने १६ वर्षीय शेफाली वर्माला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर शेफालीचा अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

भारतीय महिलांचा अभिमान वाटतो…

जरी आज विश्वचषक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव झाला असला तरी त्यांनी संपूर्ण विश्वचषकामध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. भारतीय महिला प्रत्येक भारतीयांची आन बाण शान आहे आणि त्यांचा आदर्श सर्व युवावर्गाला आहे.