मनसेची शॅडो कॅबिनेट टीम जाहीर; राज ठाकरेंनी केली घोषणा

0
429

नवी मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त शॅडो कॅबिनेटची घोषणा राज ठाकरेंनी केली. ”वाभाडे काढण्यासाठी मंत्री मंडमंडळाची स्थापना करण्यात आली”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. सरकावर अंकूश ठेवण्यासाठी या शॅडो कबिनेट म्हणजेच प्रतिरुप मंत्रिमंडळाची घोषणा केली असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. या मंत्रीमंडळात मनसेच्या साऱ्या विश्वासू पदाधिकारी आणि नेत्यांचा समावेश आहे, पण जर कोणाला काम करण्याची इच्छा आहे मात्र ती व्यक्ती राजकारणात किंवा पक्षात नाही तर तिनं येऊन माझी भेट घ्यावी त्या व्यक्तीचा समावेश नक्कीच मंत्रीमंडळात करण्यात येईल”.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत विरोधात असलो तरीही सरकारने चांगलं काम केल्यास त्याचं अभिनंदनही केलं गेलं पाहिजे हा मुद्दा मांडला. सोबतच आपल्या पक्षांची साथ देणाऱ्या जनतेचे आभारही मानले.

  • मनसे शॅडो कॅबिनेट टीम पुढीलप्रमाणे :-
  • गृह, विधी व न्याय,सामान्य प्रशासन- बाळा नांदगावकर
  • वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई
  • जलसंपदा अनिल शिदोरे
  • महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर
  • सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे
  • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता
  • शालेय उच्च शिक्षण – अभिजित पानसे
  • ग्रामविकास – अमित ठाकरे
  • कामगार – राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे
  • नगर विकास आणि पर्यटन – संदिप देशपांडे , अमित ठाकरे
  • वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन – अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी
  • उर्जा – शिरीष सावंत , सागर देवऱह
  • सार्वजनिक उपक्रम – संजय शिरोडकर
  • सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
  • रोजगार हमी आमि फलोत्पादन – बाळा शेडगे
  • सार्वजनिक बांधकाम – योगेश परुळेकर
  • सामाजिक न्याय – गजानन काळे
  • अन्न नागरी पुरवठा – राजा चौघुले
  • महिला बालविकास – शालिनी ठाकरे , सुनीता चुरी
  • उत्पादन – वसंत फडके
  • पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील
  • आदिवासी विकास – आनंद एंबडवार
  • केतन जोशी – सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग
  • पाणी पुरवठा – अरविंद गावडे