कोरोना व्हायरस; न घाबरता संकटाला सामोरे जाऊया

0
458

चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. कोरोना व्हायरस हा व्हायरसचा एक विस्तृत समूह आहे. मेडिकल सायन्समध्ये आतापर्यंत केवळ 6 कोरोना व्हायरसाचा शोध लागला आहे. त्यामुळे या नवीन व्हायरसच्या शोधामुळे आता यांची संख्या 7 झाली आहे. या व्हायरसला nCoV नावाने देखील ओळखले जाते. या आधी कोणत्याही व्यक्तीला या व्हायरसने ग्रासले नव्हते.

चीनमधील वुहान क्षेत्रातील लोकांवर या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. हा व्हायरस जलचर जीव अथवा वन्य प्राण्यांच्या बाजारातून मनुष्यापर्यंत पोहचला असण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक या व्हायरसवर उपचारासाठी वॅक्सिनचा शोध घेत आहेत.

भारतातही कोरोनाने प्रवेश केला असून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांच्यामते कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास विषाणूची बाधा झाली तरी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असते. ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते.

  • कोरोनाचे लक्षणे
  • नाक गळणे
  • खोकला
  • घसा खवखवणे
  • डोकेदुखी
  • ताप
  • अस्वस्थ वाटणे
  • शिंका येणे, धाप लागणे
  • थकवा जाणवणे
  • निमोनिया, फुफ्फुसात सूज
  • उपाय काय करावे :-
  • खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंडाला रुमालाने झाकावे. ज्यांना सर्दी किंवा फ्ल्यू असेल अशांशी जवळून संपर्क साधू नये
  • जंगली आणि शेतांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांशी संपर्क करू नये, त्यांच्यापासून लांब राहा
  • गर्दीमध्ये जाण्याचे शक्यतो टाळावे
  • जर तुम्हाला असे वाटले की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन त्याबद्दल माहिती द्यावी
  • जास्तीत जास्त पाणी प्या; सकाळी कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करा.
  • फळे, भाज्या न धुता खाऊ नये
  • अफवांवर विश्वास ठेवू नका
  • घाबरून न जाता आव्हानाला सामोरे जा