झोप येत नाही तर वाचा हे दुष्परिणाम

0
453

बदललेल्या जीवशैलीमुळे तसेच कामाचे ताण आणि डोक्यात सारख्या कोणत्याना कोणत्या विचारामुळे झोपच लागत नाही असे खूप ठिकाणी ऐकायला मिळत आहे. आपला मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना योग्य मात्रेमध्ये विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे अति मोबाइल वापरामुळे सुद्धा झोप पूर्ण होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर आपल्या शरीराला योग्य प्रमाणात झोप मिळाली नाही तर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. जाणून घेऊया त्याबद्दल:

  • सतत अपुऱ्या राहणाऱ्या झोपेमुळे त्याचे वाईट परिणाम मनावर आणि शरीरावर होत आहेत. सतत थकल्यासारख वाटणं, अशक्तपणा, पाठदुखी अशा समस्या वाढल्या आहेत.
  • आपल्याला पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळत नाही, तेव्हा आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. आपण कोणत्याही कारणावरून चिडचिड करायला लागतो.
  • स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते.
  • वजन वाढू लागते
  • विस्मरण, रक्तातली साखर वाढणं, चेहऱ्यावर सतत थकवा, लठ्ठपणा, पोटाचे विकार, डोकेदुखी, अंगदुखी अशा विविध समस्या उद्भवतात.
  • उच्च रक्तदाब आणि मनावरचा ताण ह्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता.
  • पचनासंबंधी तक्रारी सुरु होतात. शरीरामध्ये सतत थकवा राहतो व कोणत्याही कामाचा उत्साह राहत नाही.
  • मोबाईलचे अतिसेवन कमी करा त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होईल.

रात्री 10 ते पहाटे 6 ही वेळ नियमित झोपेची असायला हवी. मात्र, झोपेचं वेळापत्रक बिघडल्यामुळे बहुतांश लोकांची ६ तासापेक्षाही कमी झोप होते. तर समजले ना झोपायचे महत्त्व. याचा अर्थ अतिझोप घेणे नाही बरं का. शरीराला कमीतकमी ६ ते ८ तास झोपही पाहिजेच.