बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टला केले बाय बाय, सामाजिक कार्यात सहभाग नोंदविणार

0
833

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. यापुढील काळात जागतिक आरोग्यासह शिक्षण, विकास आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर काम करायचं आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी दिली. असं असलं तरी ते कंपनीचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

बिल गेट्स आगामी काळात जागतिक आरोग्य विकास, शिक्षण आणि जागतिक हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर काम करणार आहेत. यासाठीच त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदावरुन राजीनामा दिला. त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. यावेळी बिल गेट्स म्हणाले, “ही कंपनी नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिल. मी यापुढेही कंपनीच्या नेतृत्वाच्या कामात सहभागी असेल. जीवनातील हे वळण मैत्री आणि सहकार्य ठेवण्यासाठी संधी आहे असं मी मानतो. या कंपन्यांमध्ये योगदान देणे हा माझ्यासाठी अभिमानाचा भाग आहे.

१९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे.