कोरोना; होम क्वारंटाइन म्हणजे नक्की असते तरी काय?

0
516

सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरले आहेत. चीन, इटली, इराण, ऑस्ट्रेलिया सोबतच भारतातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून सुरक्षितेसाठी एक शब्द ऐकायला मिळतोय तो म्हणजे होम क्वारंटाइन. होम क्वारंटाइनचा अर्थ आहे घरामध्ये इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवणे. तुम्हाला करोनाची लागण झाल्याचा संशय असल्यास किंवा तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असल्यास तुम्ही स्वत:ला एका वेगळ्या खोलीत सर्वांपासून अलग राहायला हवे. असे केल्याने तुमच्या घरातील इतर सदस्यांना विषाणूचा संसर्ग होणार नाही.

क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. आता भारतातही शेकडो नागरिकांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करुन ठेवण्यात आलंय. यात अधिक तर परदेशाहून भारतात परत आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. शिवाय, कोरोनाग्रस्त, कोरोनाची लक्षणं असलेले नागरिक, तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे.

घरांमध्ये कसे करू शकता क्वारंटाईन

  • होम क्वारंटाइनसाठी एक हवा खेळती राहिल अशी खोली हवी, यात टॉयलेटही असावे.
  • त्याच खोलीत आणखी कुणी असेल तर त्यांच्यामध्ये १ मीटर इतके अंतर असावे.
  • दोन्ही व्यक्तींनी घरातील वृद्ध आणि गरोदर स्त्रिया, तसेच मुलांपासून दूर राहावे.
  • संशयित रुग्णाने कोणताही समारंभ, लग्न, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये १४ दिवस किंवा पूर्ण बरे होईपर्यंत जाणे टाळावे.
  • साबणाने हात धुवा, अल्कोहोल असलेल्या चांगल्या हँड सॅनिटायझरचा वापर करावा.
  • मास्कचा वा स्वच्छ धुतलेले कपड्याचा वापर करावा, ते प्रत्येकी पाच ते सहा तासांनी बदलावे.
  • घरातील एकाच व्यक्तीने क्वारंटाइन राहिलेल्या व्यक्तीची देखभाल करावी.
  • घराची साफसफाई करताना हँडग्लोव्हज घाला, ते काढून टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवा
  • मानसिकरित्या खचून जावू नका