सकाळच्या घाई गडबडीत रोज नाश्त्याला काय बनवायचे ,मग दुपारच्या डब्याला, संध्याकाळच्या नाश्त्याच्या डब्यात काय खाऊ आणि वर रात्री जेवणात कोणता पदार्थ बनवू किती गोंधळ होतो ना… कधी कधी बऱ्याचवेळा ढोकळा खायची इच्छा असते पण बेसनमुळे पोटाच्या तक्रारी वाढतात म्हणून काहीजण टाळतात. पण मी आज असा मेनू घेऊन आलो आहे जो तुम्हाला नक्की आवडेल तो म्हणजे रवा ढोकळा.
- साहित्य:
- १ कप = २०० ग्रॅम्स बारीक रवा ( बॉम्बे रवा )
- पाऊण कप = १८० ग्रॅम्स दही
- ४ हिरव्या मिरच्या
- अर्धा टीस्पून मीठ
- अर्ध्या लिबचा रस
- दीड टीस्पून साखर
- पाव कप कोथिंबीर
- २ इनो रेग्युलर ( चवविरहित ) ) पाकीट ( ५ ग्राम प्रत्येकी )
- अर्धा टीस्पून मोहरी
- १ टीस्पून पांढरे तीळ
- चुटकीभर हिंग
- १० -१२ कढीपत्ता
- १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
- पाव टीस्पून लाल मिरची पूड
- १-२ टेबलस्पून तेल
- पाणी गरजेनुसार
- कृती:
- मिरच्या आणि २ टेबलस्पून कोथिंबीर मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी .
- एका बाऊलमध्ये दही , वाटलेला मसाला , मीठ , साखर आणि लिंबाचा रस घालून नीट फेटून घ्यावे , गुठळ्या राहू देऊ नयेत
- अर्धा कप पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यावे . यात थोडा थोडा रवा घालून नीट एकत्र करून घ्यावे . १ टीस्पून तेल घालावे म्हणजे ढोकळा आतून लुसलुशीत बनतो . अजून पाव कप पाणी घालून एकत्र ढवळून घ्यावे . हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे .
- एका प्रेशर कुकर मध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . ढोकळ्याच्या मिश्रणाला झाकून १५ मिनिटे झाली की कुकर च्या डब्याला आतून तेल लावून घ्यावं. मिश्रणात इनो घालून वरून १-२ टीस्पून पाणी घालावे . ऍक्टिव्हेट झालेले इनो मिश्रणात नीट ढवळुन घ्यावं , मिश्रणावर बुडबुडे दिसू लागतात ! वेळ न दवडता लगेच हे मिश्रण डब्यात ओतून घयावे . हा डबा कूकरमध्ये एका स्टॅण्डवर ठेवून कूकरचे झाकण लावून घ्यावे , शिटी काढून टाकावी . मोठ्या आचेवर २ मिनिटे वाफ बाहेर यूएईपर्यंत शिजवावे नंतर आच मंद करून १२ -१३ मिनिटे वाफवून घ्यावे .
- गॅस बंद करून कुकर जरा थंड झालयावर उघडावा . ढोकळा थंड झाला की डब्याच्या कडेने सूरी गोल फिरवून त्याच्या कांदा सैल करून घ्याव्यात आणि एका ताटात काढावा .
- लाल मिरची पूड वरून भुरभुरावी . आपल्या हव्या त्या लहान मोठ्या आकारात ढोकळा चौकोनी कापून घ्यावा .
- १ -२ टेबलस्पून तेल गरम करून त्यात तीळ खरपूस तळून घ्यावेत . नंतर त्यात मोहरी , हिंग , होरवी मिरची आणि कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी करून घ्यावी . ही फोडणी ढोकळ्यावर घालावी . मस्त रव्याचा मऊ ढोकळा तयार !
- तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करा आणि फोडणी त्यावर व्यवस्थित पसरवा . वरून कोथिंबीर घालून सॉस सोबत सर्व्ह करा .