मुखमंत्री ठाकरे: कोरोना वर मात करण्यासाठी सुचनांचे पालन करा

0
607

कोरानाशी युद्ध करत असताना ज्या-ज्या सूचना केल्या जात आहेत त्यांचे पालन केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. कोरोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असं सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सरकारनं दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी सर्व पाळाव्या. राज्यात आवश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. लोकल, बसमधील गर्दी ओसरली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारनं दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी. सरकार काही गोष्टी बंद करू शकतं, पण तसं करण्याची सरकारची इच्छा नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. “राज्यातील चाचणी केंद्र सुरू करण्यावर आज पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तसंच आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनीही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय. राज्यातील चाचणी केंद्र वाढवण्यासही ते मदतीसाठी तयार आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुमच्या सर्वांचे सहकार्य हेच आपले बळ आहे. घाबरण्याचे कारण नाही. घाबरुन किंवा भितीने युध्द लढले जात नाही. तर ते जिद्दीने लढावे लागते. कोरोनाविरुद्धची लढाई हेदेखील वेगळ्याप्रकारचे युद्ध आहे. अशावेळी नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे. रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आपल्यासाठी २४ तास झटत आहेत. त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती आहे. मात्र, भारतीय जवानांप्रमाणे जीवावर उदार होऊन हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. संकट हे आपत्तीसारखे असते. सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपले काहीही वेडेवाकडे करु शकत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.