आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सोशल मीडियावरून कौतुकांचा वर्षाव

0
456

कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा ४९ वर पोहचला आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन कामाची परवानगी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहोरात्र झटताना दिसत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष राजेश टोपे काय सांगतात याकडे लागलेले असते. दरम्यान, राजेश टोपे यांच्या एका फॅनने त्यांच्याबद्दल फेसबुकवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. स्वतःची आई गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या आजारांशी सामना करत असतानाही हा अवलिया राज्याच्या संरक्षणासाठी झटताना दिसत आहे.

कोरोना व्हायरसचा ज्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतोय तसे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अंत्यत गंभीरपणे लक्ष देत असून त्याचा परिणाम कसा कमी करता येईल यावर लक्ष घालत आहे. पत्रकारांद्वारे जनतेला रोज त्याबद्दल चोख माहिती देण्याचे काम असो वा काळजी करण्याचे आवाहन असो ते एकप्रकारे कामाद्वारे त्यांची छाप सोडत आहे. राजेश टोपे यांची आई आजारी असून सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनापासून कसे मुक्त करता येईल यावर ते लक्ष्य ठेवून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दिवसभर डोळ्यांत तेल घालून ड्युटी निभावणाऱ्या पोलिसांची गैरसोय तर होत नाही ना, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होतेय की नाही याबद्दलही सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आस्थेने विचारपूस केली. राज्य सरकारने घेतलेली खबरदारी पाहता सोशल मीडियावर त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

राजेश टोपे यांच्यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट
”एकीकडे #आई मुंबईतील हॉस्पिटलमध्ये 20 दिवसांपासून विविध आजारांनी मृत्यूशी झुंज देत आहे!, तरीही आईची सेवा करायला, काळजी घ्यायला पुरेसा वेळ मिळत नसल्याने, भैय्या साहेबांचे डोळे पानवतात, मात्र अवघ्या महाराष्ट्राची जबाबदारी खांद्यावर असल्याने क्षणात भैय्या साहेब स्वतःला सावरतात!.#संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपले आई-वडील,भाऊ,बहीण समजून त्यांना जीवघेणा coronavirus सारखा आजार होऊ नये म्हणून सेवा करतांना दिसुन येत आहेत!, @#अशा या महान नेत्यापुढे महाराष्ट्र नतमस्तक आहे!,@#We are proud of you भैय्या साहेब!, अशी पोस्ट या फॅनने शेयर केली आहे.