वर्क फ्रॉम होम करताय तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा

0
639

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या शाळा, हॉटेल्स, व्यायामशाला, दुकाने इत्यादी बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रभाव जास्त वाढू नये यासाठी कंपन्यांनाही वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस सारख्या संकटाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच नागरिक सज्ज झाले आहेत. मात्र हे सर्व करत असताना कोणत्याही कर्मचा-याचे तसेच कंपनीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी वर्क फ्रॉम होम ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र हे करत असताना देखील कर्मचा-यांनी काही गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होम करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

  • तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा, ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कम्पूटर यांचा साफ करूनच वापर करा.
  • लॅपटॉप, मोबाईल ची चार्जिंग फुल आहे की नाही ते नीट तपासा. तसेच त्यांचा चार्जर ही जवळ ठेवा.
  • व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा कॉल करुन ऑफिसच्या सहकर्मचा-यांशी किंवा ज्येष्ठांशी संभाषण करायचे असेल एका वेगळ्या खोलीत जाऊन करा. घरातील नेट स्पीड व्यवस्थित आहे की नाही ते नीट तपासा.
  • लॅपटॉप, संगणकाला पासवर्ड ठेवून ते सुरक्षित ठेवा. तसेच मोबाईल लहान मुलांपासून दूर ठेवा अन्यथा त्यांच्याकडून वारंवार चुकीचा पासवर्ड टाकल्याने मोबाईल लॉक होऊ शकतो.
  • लॅपटॉप, संगणकावर काम करत असताना डेटा सेव्ह करत रहा अन्यथा स्वत:ला ईमेल करुन त्याचा बॅकअप ठेवा. (जर घरात लहान मुळे असतील तर न विसरता हे काम करा) घरातून काम करण्यासाठी वेबडेटा सारख्या शेअर ड्राईव्हचा वापर करा. ज्यामुळे आवश्यक माहिती ठेवता येईल. म्हणजे इतर कर्मचारीसुद्धा आवश्यकतेनुसार ते डेटा वापरू शकतात.

वर्क फ्रॉम होम साठी महत्वाचे ठरतील हे अ‍ॅप:

वर्कप्लेस बाय फेसबुक
सोशल मीडिया म्हणून फेसबुककडे पाहिलं जातं. जास्तीतजास्त आणि सातासमुद्रापार राहत असलेल्या लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुकचा उपयोग होतो. थोडक्यात काय, तर संवादाचं प्रभावी माध्यम म्हणून फेसबुककडे पाहिलं जातं. पण, याच फेसबुकचं ‘वर्कप्लेस बाय फेसबुक’ हे अ‍ॅपसुद्धा आहे. याविषयी फारच थोड्या जणांना माहिती आहे. हे अ‍ॅप कॉर्पोरेट विश्वासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हे अॅप फायदेशीर आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होम करत असाल, तर या अ‍ॅपचा उपयोग करू शकता.

स्लॅक
विंडोज, मॅक, आयओएस, अँड्रॉइट आणि वेब अशा सगळ्या माध्यमांसाठी उपलब्ध असलेलं अ‍ॅप म्हणजे स्लॅक. कॉर्पोरेट मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतं. म्हणजेच टीममधल्या सदस्यांमधील संवाद सुरळीत ठेवण्यासाठी हे प्रभावी ठरते, त्यामुळे कधीही वर्क फ्रॉम होम करायचे असल्यास हे अप फार उपयोगी पडते. यावरुन फाइल शेअर करणंही सोयीचं आहे. तसंच व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्ससाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतं. याद्वारे तुम्ही स्क्रीन शेअरिंगही करु शकता.

बीटरीक्स २४
टीमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या दिवसांची अपडेट्स ठेवणारं, ग्रुप चॅट करण्याची सोय आणि टीम म्हणून काम करताना निर्णय घेण्यास उपयुक्त ठरणारं टूल म्हणून बीटरीक्स २४कडे बघितलं जातं. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना टीममधील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणांहून कार्यरत असतात. अशा वेळी संवादांमध्ये अडथळा येऊन गैरसोय होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी बीटरीक्स २४ फायदेशीर ठरतं