राज्यामध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
452

राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

रेल्वे आणि बस शहराच्या वाहिन्या आहेत. ते बंद करणं सोपं आहे. पण त्या बंद झाल्यातर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. आरोग्य कर्मचाऱ्यांवरही, अन्य कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. तुर्त या दोन सेवा बंद होणार नाहीत, सरकारी कार्यालयात २५ टक्के हजेरी असेल. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद उत्तम आहे. काही ठिकाणी ऑफिस सुरू आहेत. परंतु आता मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार आहोत. ही बंदी ३१ मार्च पर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.

जीवनावश्यक क्षेत्रासाठी काम करत असलेली खाजगी कार्यालये वगळून अन्य सर्व कार्यालयेही बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं या काळातील सुट्टीचं वेतन कापू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. ही फिरण्याची सुट्टी नाही. गर्दी कमी न झाल्याचं वाटल्यास नाईलाजानं रेल्वे बससेवा बंद करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी समाजातील अनेक संस्था पुढे येत आहेत. काही जणांनी या संकटातून मदत करायला सुरूवात केली आहे. म्हणूनच मला अभिमान वाटतो की प्रत्येक जण या लढ्यात माझ्यासोबत आहे. आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज हे आता आपल काम थांबवून ते मदत करायला पुढे आले आहे. त्यामध्ये चित्रपट सृष्टीतील दिग्गज आहेत. या सगळ्यांनी मिळून एक शॉर्ट फिल्म केली आहे. त्यासाठी रोहित शेट्टी यांनी पुढाकार घेत अप्रतिम असे योगदान दिले आहे. ही फिल्म त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केली आहे. सीएमओ ऑफिसमधून ही फिल्म आता प्रसारीत करण्यात आली आहे. रोहित शेटी, अमिताभ बच्चन, अनिल कपुर, माधुरी दीक्षित, आलिया भट, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, अर्जुन कपुर, रणवीर सिंह, वरूण धवन, अजय देवगन, आयुषमान खुराना, विराट कोहली, सचिन प्रत्येकजणाने आपआपल्या परीने आवाहन केले आहे. या सगळ्या एकजुटीसाठी चांगला प्रतिसाद मिळतोय. आपल नात हे विश्वासाच नात आहे, आपण एकत्रच या संकटावर मात करू शकतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.