कोरोना: पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द, दहावीचे उर्वरीत पेपर हे वेळापत्रकानुसार

0
498

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्या सर्वांनाच परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वार्षिक अहवाल पाहून त्यांना गुण दिले जातील. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नववी, अकरावीचे उर्वरित पेपर हे १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार आहेत. महत्वाचं म्हणजे दहावीचे उर्वरीत पेपर हे वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीच गेल्या आठवड्यात राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याप्रमाणे शाळा, महाविद्यालये बंद होती, पण शालेय परीक्षाबाबत निर्णय जाहीर झालेला नव्हता. त्यासंदर्भात आज शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेत अखेर निर्णय घेतला आहे. सोबतच, 10 वी वर्गाचे शिक्षक वगळता इतर वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 10 वीच्या परीक्षा सुरू असताना शाळा आणि परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या दोन विषयांचे पेपर अजुनही झालेले नाहीत. या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. हा निर्णय केवळ एसएससी बोर्डाच्या परीक्षांसाठी लागू राहील असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.