सॅनिटायझर वापरताय तर हे नक्की माहीत करून घ्या

0
415

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा वाढत जातोय तसा सॅनिटायझरचा वापरही वाढत चालला आहे. सॅनिटायझरचा वापर जसा चांगला आहे तितकाच अतिवापरही चांगला नाही बरं का. सॅनिटायझर्सच्या अति प्रमाणात वापरामुळे देखील नुकसान होऊ शकते. जास्त अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरणे किंवा वारंवार हात धुण्यामुळे उलट परिणामही होऊ शकतो. लोकं आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये या भीतीनं मिनिटामिनिटाला हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करत आहे.

सॅनिटायझरचा अतिवापर केल्यामुळे हात कोरडे होऊ शकतात, भेगा (क्रॅक) पडू शकतात आणि रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो. ज्यामुळे जंतू शरीरात प्रवेश करू शकतील आणि शरीरासाठी धोकादायक असू शकतात. अशा इतर समस्या उद्भवू शकतात.

  • सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल कमी असल्यास ट्रायक्लोसॅनचे प्रमाण जास्त असते. यामुळे सर्दी किंवा खोकला यासारख्या समस्या अधिक होऊ शकतात.
  • हॅन्ड सॅनिटायझरचा सतत वापर त्वचेसाठी घातक आहे.
  • यातील फालेट्स हुंगल्याने किंवा कोणत्याप्रकारे शरीरात गेल्यास नुकसान होऊ शकते. याचा सर्वात जास्त प्रभाव फर्टिलिटीवर पडतो.
  • सॅनिटायझर बॅड बॅक्टेरियासोबतच गुड बॅक्टेरियाही नष्ट करतो. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.
  • हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्यानं स्किन इन्फेक्शन, स्किन अलर्जी होते. त्यामुळे काही कारण नसताना, गरज नसताना हँड सॅनिटायझर वापरू नका.

सॅनिटायझरचा वापर कधी कराल:
प्रत्येक व्यक्तीने हे खात्री केले पाहिजे की खाण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुवावेत. कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालयातून घरी आल्यानंतर आपले हात, पाय आणि चेहरा स्वच्छ धुवावेत. याव्यतिरिक्त, लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे आणि त्यांनी ते केल्यास स्वच्छतेच्या मूलभूत सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, अशा व्यक्तींचं सामान उचलल्यास, गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवं. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत.