पंतप्रधानच्या जनता कर्फ्यू आवाहनाला सेलिब्रिटींचीही आहे साथ

0
510

जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. आपल्या देशातही करोनाच्या रुग्णांच्या संख्यत वाढ होत आहे. कोरोनाचे संक्रमण कमी व्हावे यासाठी पीएम नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याला त्यांनी जनता कर्फ्यू असे नाव दिले आहे. येत्या 22 मार्च रोजी लोकांनी घराबाहेर पडू नये असं त्यांनी सुचवलं आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री नऊ पर्यंत लोकांनी बाहेर पडू नये असं त्यांनी सांगितलं.22 मार्च, रविवारच्या दिवशी आपण संध्या. 5 वा. सायरनचा आवाज होईल. तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. या जनता कर्फ्यूला सर्व सेलिब्रिटींनीही पाठींबा दर्शविला असून त्यांनी सर्वांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही सांगितले आहे.

बॉलिवूड कलाकारांनी दर्शविला पाठींबा

अजय देवगण
नमस्कार! आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की करोनाशी दोन हात करण्यासाठी जनता कर्फ्यू पाळा. २२ मार्चला सगळ्यांनी घरात थांबा. काळजी घ्या.

शिल्पा शेट्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण स्वत: काळजी घेणं आणि सुरक्षीतता पाळणं गरजेचं आहे. पॉझिटीव्ह आणि जवाबदार नागरिक बना. जय हिंद.’

रितेश देशमुख‘
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे वर्क फॉर्म होम करावं असं सांगितलं आहे. ६० वर्षावरील व्यक्तींनी घरातून बाहेर पडू नये. मला खात्री आहे भारत करोनाशी दोन हात करेल.

तसेच शबाना आझमी, रोहित शेट्टी, करन जोहर, कार्तिक आर्यन,अक्षय कुमारसोबतच अनेक कलाकारांनी पाठींबा दिला आहे.

मराठी कलाकारांनीही केले आवाहन

श्रेया बुगडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. इतर देशांनी आपल्याकडच्या प्रभावशाली उपाययोजनांचं, यंत्रणेचं कौतुक केलं आहे. त्यामुळे या यंत्रणेला सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे.मी स्वत: रविवारी घरी थांबणार आहे. एवढंच नाही, तर माझ्याकडे घरकाम करायला येणाऱ्यांनाही त्या दिवशी सुट्टी दिली आहे.

सुबोध भावे
रविवारी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’चं पालन सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. सध्या खऱ्या-खोट्या माहितीचा महापूर आला आहे. पण, सरकारकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. पंतप्रधानांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, कारण ती त्यांची जबाबदारी आहे.करोनाबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाच्या सर्व सूचनांचं सगळ्यांनी पालन करणं गरजेचं आहे.

अद्वैत दादरकर
सध्या जगभरात करोना थैमान घालतोय. त्याचा फैलाव रोखण्यासाठी ठोस पावलं उलचणं गरजेचं आहे. जगातील इतर देशांनी सूचनांचं पालन करुन या रोगाचा प्रसार थोपवला आहे. त्यामुळे आपल्या देशातील शासकीय यंत्रणांकडून ज्या सूचना केल्या जात आहेत त्याचं काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे. ते आपल्या हिताचं आहे. जनता कर्फ्यूही एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

रेणुका शहाणे
घरी थांबण्याच्या सूचनेचं पालन मी स्वत: गेल्या तीन-चार दिवसांपासून करतेय. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला माझा पाठिंबा आहे. त्या दिवशी मी माझ्या कर्मचाऱ्यांनाही सुट्टी दिली आहे. आपण अलिप्त राहिलो तर ही साखळी थांबवू शकतो, संसर्ग कमी होऊ शकतो. जनता कर्फ्यूचा निर्णय योग्यच आहे.

यासोबतच स्वप्नील जोशी, तेजश्री प्रधान अशा अनेक मराठी कलाकारांनी या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे