‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचा कोणी जात नाही’; मराठी कलाकारांचा भन्नाट संदेश

0
343

सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा टीमने करोना विषाणूचं देशावर असणारं संकट आणि त्याकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टीकोन यावर भाष्य केलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील आपली सुजाणता विसरून काही लोक बाहेर फेरफटका मारायला हमखास जात आहेत. अशा लोकांसाठी नेहमी सर्वांना हसवणाऱ्या महाराष्ट्र हास्यजत्रेच्या टीमने प्रेक्षकांना व्हिडीओद्वारे महत्त्वाचा संदेश दिला आहे.

आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा मान राखून तरी सर्वांनी घरी बसून स्वत:चं व देशाचं रक्षण करावं असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. ‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचा कोणी जात नाही’, अशा शब्दांत या कलाकारांनी लोकांना सध्या घरी राहण्याचं महत्त्व पटवून देत आहेत.

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on Mar 26, 2020 at 10:51pm PDT

जोवर आपली कोणी जवळची व्यक्ती दगावत नाही तोवर आपल्याला परिस्थितीची जाणीव होत नाही. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. हेच या व्हिडिओतून प्रामुख्याने सांगण्यात आलं आहे. सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम यांनी मिळून ही कलाकृती सादर केली आहे. नेहमी सर्वांना हसवणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टीमने या कलाकृतीद्वारे केलंय प्रत्येकाला घरी राहून स्वतःच्या आणि देशाच्या मदतीचं आवाहन याद्वारे केले आहे.