देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनच्या काळात योग्य उपाययोजना करत आहेत. यातच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संकटाशी सामना करण्यासाठी ‘पीएम-केअर फंड’ सुरू केला आहे. त्यांनी देशातील नागरिकांना यात दान करण्याची अपील केली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेकांचा हातभार लागत आहे. उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही मदत केली आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनिधींकडूनही मदत होत आहे. आमदार आणि खासदारांनीही मदत केली आहे. तसेच राज्यातील उद्योगपतींनीही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यापुर्वीच वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी देण्याची घोषणा केली होती. तर महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे म्हटले होते.
अशातच टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला 1500 कोटीची मदत करण्याचे जाहीर केले आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने लवकरात लवकर पुरवावीत. सुरुवातील रतन टाटा यांनी 500 कोटी देण्यासंबंधी माहिती दिली होती. पण, थोड्यावेळानंतर टाटा ग्रुपकडून अजून 1 हजार कोटी देण्याचे जाहीर करण्यात आले.
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एका तासाच्या आत प्रतिसाद दिला. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. अक्षय प्रमाणे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी करोनाच्या लढ्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. रितेश देशमुख, हृतिक रोशन, रिचा चढ्ढासह इतर कलाकारांचा समावेश आहे. कोणी पोटावर हात असलेल्या कामगारांसाठी पुढं आलं आहे तर कोणी गरजू रुग्णाच्या उपचारासाठी मदत केली आहे.
रिलायन्स ग्रुपने मुंबईत बीएमसीच्या मदतीने कोरोनासाठी स्पेशल 100 बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. बीएमसीच्या मदतीने फक्त दोन आठवड्यात हे हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलचे नाव देखील कोविड-19 ठेवले आहे.
पंकज एम मुंजाल चेयरमन (हीरो सायकल्स) कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी कंपनीच्या इमरजंसी फंडमधून 100 कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बजाज ग्रुप हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर चांगले करण्यासाठी, अन्न आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बजाज ग्रुपकडून 100 कोटी रुपये देण्याची घोषणा.
विजय शेखर शर्मा, फाउंडर-सीईओ (पेटीएम) त्यांची कंपनी वेंटिलेटर आणि इतर महत्वाच्या सामानासाठी 5 कोटी रुपेय देईल.
पारले कंपनी पुढील काही दिवसात 3 कोटी बिस्कीट पुडे वाटणार आहे.
पंतप्रधानांच्या पीएम-केअर्स फंडात छोट्यातले छोटे योगदान देखील स्वीकारण्यात येणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. मोदी पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या युद्धात प्रत्येकाला योगदान द्यायचे आहे. त्यांच्या या भावनेचा आदर करत पीएम-केअर फंड सुरू केला आहे. यात तुमच्या मर्जीने तुम्ही दान करू शकता. यामुळे देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात बळ येईल आणि संकटसमयी हा पैसा देशाच्या कामी येईल.