कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या करणं आवश्यक आहे. जितक्या जास्त चाचण्या होतील, तितक्या जास्त कोरोनाच्या संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी बळ मिळेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासंदर्भातील दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतंच केंद्राने महाराष्ट्राला कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी ‘पूल टेस्टिंग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ करायला परवानगी दिली.
पुल टेस्टिंग म्हणजे काय?
एकाचवेळी 5 जणांच्या घशाच्या स्त्रावाची चाचणी केली जाते. आयसीएमआरच्या नियमांप्रमाणे एकाचवेळी 5 जणांचे स्वॅब टेस्ट घेतले जातात. यापैकी जर कुणालाही कोरोनाची लागण नसेल तर स्वाभाविकपणे कोरोनाची चाचणी निगेटीव्ह येईल. अशी चाचणी करण्याने एकाच वेळी 5 जणांची कोरोना टेस्ट होऊ शकते. कमी कालावधीत अनेक जणांच्या कोरोना टेस्ट होऊ शकतात. तसंच कमी किंमतीत टेस्ट होऊ शकतात.
ही पद्धत वापरुन आपण चाचण्यांचा वेग वाढवू शकतो आणि सध्या उपलब्ध असलेल्या मोजक्या साधनांमध्ये जास्तीत जास्त लोकांची चाचणी कमी दरामध्ये करु शकतो. पूल टेस्टिंगसंदर्भात आयसीएमआरने गाईडलाईन्स दिल्या आहेत. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर हा 2-5 टक्के आहे, तिथेच पूल टेस्टिंग केलं जावं, असं आयसीएमआर सांगतं. तर ज्या भागात पॉझिटिव्ह येण्याचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे पूल टेस्टिंग टाळावं असंही आयसीएमआरने सांगितलं आहे. विशेष म्हणजे जेव्हा एचआयव्ही या व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले होतं, तेव्हाही पूल टेस्टिंगचा वापर केला गेला होता.
या साथीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे संसर्ग झालेल्या जास्तीत जास्त लोकांना शोधणे, त्यांचे टेस्ट करणे आणि लक्षणं गंभीर असल्यास उपचार करणे. त्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करणं हा एकमेव पर्याय आहे. अशा परिस्थितीमध्ये वेळ, खर्च आणि संसाधनांची उपलब्धता या सगळ्या दृष्टीकोनांतून पूल टेस्टिंग उपयोगी ठरेल.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय???–
कोरोतून पूर्णपणे सावरलेला व्यक्ती त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात त्या पेशी सध्या कोरोनाने ग्रासलेल्या रूग्णांच्या शरीरात टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि याने कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. प्लाझ्मा थेरपीमुळए रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर वाढू शकतो, ही खीप दिलासादायक बाब आहे. प्लाझ्मा थेरपी ही सर्वप्रथम अमेरिकेत पार पडली होती. कोरनाला संपवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे.
प्लाज्मा थेरपीचा वापर कसा केला जातो?
- विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात.
- बर्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडी काढून दुसर्या आजारी रुग्णाच्या शरीरात टाकल्या जातात.
- अँटीबॉडी शरीरात प्रवेश करताच रुग्णाच्या प्रकृतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो.
- अँटीबॉडीमुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढीस लागते.