‘ये दिन भी ढलेंगे’ मराठी कलाकारांनी दिला नवा संदेश

0
388

संपूर्ण देशावर कोरोनाच्या विषाणूचे सावट असल्यामुळे प्रत्येक देशातील नागरिक कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मात्र, असे असताना देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या रक्षणासाठी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी कमा करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरातून या योद्धाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, अलिकडेच ‘तू चालं पुढे’ या गाण्यातून कलाकारांनी या योद्धांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता मराठी कलाकार पुन्हा एक नवीन गाणे घेऊन आले आहेत.

सध्या कोरोना असल्यामुळे फार कठीण काळ आला आहे. मात्र, काळ कितीही वाईट असला तरी तो फार काळ टिकत नाही’, असे सांगणारे ‘ये दिन भी ढलेंगे’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या देशावर, जगावर जे वाईट दिवस ओढावले आहे तेदेखील जातील आणि आशेचा नवा किरण उगवेल असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार मंडळी झळकली असून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आपटे हे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
 
टी-सीरिज यांची निर्मिती असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. हे गाणे समृद्धी पोरे यांनी लिहीले असून त्यांनीच दिग्दर्शनही केले आहे. या गाण्याला सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरुप भालवनकर, जान्हवी प्रभू अरोरा आणि किर्ती किल्लेदार यांचा स्वर आहे. तर स्वरुप भालवनकर यांनी या गाण्याला संगीत दिले असून यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आपटे, शरद पोंक्षे, मोहन आगाशे, सुदेश भोसले, अनिल देशमुख, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक, स्मिता तांबे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, सुनील बर्वे, समृद्धी पोरे, भार्गवी चिरमुले, आशिष चौगुले, समीर धर्माधिकारी, भारत गणेशपुरे यासारखे अनेक कलाकार झळकले आहेत.