सावधानगी बाळगा; ही आहेत करोना व्हायरसची ६ नवीन लक्षणे

0
496

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. करोना व्हायरसवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी देशामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर सर्दी, ताप, खोकला, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे या सारखी लक्षणं असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र यात मोठे आव्हान म्हणजे अनेक लोकांना अशी लक्षणं दिसून येतच नाही. अनेकांना कोरोना झालाय पण त्यांना हा त्रास होत नाही. अशामध्ये अमेरिकेत कोरोनाची आणखी सहा नवीन लक्षणं दिसून आली आहेत. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (CDC) यासंदर्भात संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. करोना व्हायरसबाधित रुग्णांमधील ही नवीन लक्षणे आधीच्या लक्षणांच्या तुलनेत वेगळी आहेत.

१ . कोरोना विषाणू ग्रस्त असणाऱ्या लोकांना थंडी वाजू शकते. इनफेक्शन झाल्यावर ज्या प्रमाणे थंडी वाजून येते त्याप्रमाणेच याचे देखील लक्षण आहे.

२. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, सर्दीसह, थंडी वाजून येणे किंवा घट्टपणा यासारखे लक्षणे देखील दिसू शकतात. थंडीमुळे रुग्णाचे शरीर थंड होऊ लागते.

३. कोरोना व्हायरसमधील तिसरे लक्षण तुम्हाला अधिक अस्वस्थ करणारे वाटू शकते. हे लक्षण करोना विषाणूच्या सामान्य लक्षणांच्या तुलनेत पूर्णतः वेगळे आहे. कोरोना व्हायरसग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये स्नायू दुखीचा (Muscle pain) त्रास उद्भवत आहे. सांधेदुखी देखील कोरोनाचे लक्षण असू शकते.

४. करोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोकेदुखीचाही (Headache) समावेश आहे. पण या आजारातील डोकेदुखीचा त्रास सामान्यतः होणाऱ्या डोक्याच्या दुखण्यापासून भिन्न आहे. डोकेदुखीसोबत तुम्हाला सर्दी-खोकल्याचाही त्रास होऊ शकतो.

५. करोना व्हायरस बाधित रुग्णांमध्ये घशामध्ये तीव्र स्वरुपात वेदना होण्याचा त्रास देखील आढळून येत आहे. हा त्रास कदाचित रात्री झोपताना चुकीच्या पद्धतीनं डोके ठेवल्यामुळेही होऊ शकतो किंवा आईस्क्रीम यासारखे थंड पदार्थ खाल्ल्यानंही घसा दुखण्याची (Sore throat) समस्या निर्माण होऊ शकते. दोन दिवसांत घसा दुखीच्या त्रासातून आराम न मिळाल्यास या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

६. लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा गंध (Smell) समजत नाही. एवढेच नाही तर त्यांना एखाद्या पदार्थाची चव देखील कळणं कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना सुगंध किंवा गंध तसंच चव ओळखण्याची क्षमता कमी (Loss of smell or taste) झाल्याचे जाणवत असल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सीडीसीने आधी सांगितले होते की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणं आढळून येत होती. चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे.