महाराष्ट्र दिन विशेष: जय जय महाराष्ट्र माझा

0
578

आज एक मे… १९६० साली आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे.

1960 सालापर्यंत महाराष्ट्र राज्य हे सर्व भाषिकांचे राज्य होते. मात्र काळाची गरज ओळखत मराठी भाषिकांसाठी राज्यात स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी वाढू लागली. यासोबतच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र या मागणीनेदेखील जोर धरला. महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य करण्याची प्रक्रिया सुरू असताना मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या मागणीला मात्र प्रचंड विरोध झाला. महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी माणसे ही मुंबईत राहणारी होती. मराठी माणसांपासून मुंबई हिसकावली जात आहे हे पाहून जनमाणसांमध्ये प्रक्षोभ वाढत गेला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी याबाबत सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनसमोर भव्य मोर्चा काढला. आंदोलकांनी मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत हा परिसर अक्षरशः दुमदुमवून टाकला होता. मात्र सरकारकडून आंदोलकांवर यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जने परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात 106 आंदोलकांना आपले जीव गमवावे लागले होते. पुढे या बलिदानापुढे नमतं घेत सरकारने १ मे रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आजही या हुताम्यांचे स्मरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जान सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असा सांगतील. पण, १ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन का साजरा केला जातो? हे जाणून घेणे आवश्यक आहे .

खर पहिला गेला तर १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत कि औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले . कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे . याविरोधात कामगार एकजूट झाले आणी त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेली अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खर्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवीन शिखर चढण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले तर आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही.