कोरोना व्हायरस :देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

0
484

संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढवला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.

सध्या असलेल्या लॉकडाउनची मुदत 3 मे ला संपणार आहे. सरकारने सांगितले की, या लॉकडाउनदरम्यान 14 दिवसांपर्यंत रेड झोनमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही. परंतू, ऑरेंज आणि ग्रीन झनमध्ये थोड्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. यापूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी हायलेवल मीटिंग बोलवली होती. बैठकीत गृह मंत्री अमित शाह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ विपिन रावत, रेल्वे मंत्री पीयूष गोयलसह सेक्रेट्री लेव्हलचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु रेड झोनमध्ये (कॅन्टोन्मेंट झोनमधील) कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.