लॉकडाऊन ४ ची घोषणा; अर्थव्यवस्थेला भरारी देण्यासाठी 20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज

0
319

(पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन 4 साठी घेत आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सोबतच, अर्थव्यवस्थेला भरारी देण्यासाठी 20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पनाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर पॅकेजमुळे भारताला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. ज गातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. ‘देशात मांगणी वाढवण्यासाठी तसेच ती पूर्ण करण्यासाठी आपला पुरवठा करणारी साखळी प्रत्येक स्तरावर मजबूत करणे आवश्यक आहे. हीच सप्लाय चेन मजबूत करताना त्यामध्ये या मातीचा आणि येथील मजुरांच्या कष्टाच्या घामाचा सुगंध यायला हवा. येत्या काही दिवसांत आर्थमंत्र्यांकडून या विशेष आर्थिक पॅकेजची माहिती दिली जाईल. स्वदेशीचे सूत्र आवलंबून देशाने पुढे जाणं आता गरजेचं आहे. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, गुतंवणूक वाढवण्यासाठी आणि व्यापार-व्यवसायाला गती देण्यासाठी या विशेष आर्थिक पॅकेजद्वारे सुधारणा केल्या जातील. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली पाहिजे. यातून सर्व क्षेत्रांची क्षमता आणि गुणवत्ता वाढेल.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:-

  • एका व्हायरसने संपूर्ण जगाला संकटात टाकलं आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठीचा आपला निश्चिय अतिशय दृढ करायचा असून कोरोनाला हरवायचं आहे. मानवाला पराभव मान्य नाही. सतर्क राहून, सर्व नियमांचं पालन करत आपल्याला कोरोनापासून वाचायचं आहे आणि पुढे जायचं आहे.
  • स्वावलंबी भारत उभारण्याची गरज आहे.
  • भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे.
  • कोरोनापूर्वी भारतात पीपीई किट तयार होत नव्हते. मात्र आता आपण पीपीई किट बनवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचं हे संकट भारतात नवी संधी घेऊन आलं आहे. भारतात आता दररोज 2 लाख पीपीई किट तयार करण्यात येत आहेत. दररोज 2 लाख एन-95 मास्कचं उत्पादन होत आहे.
  • प्रत्येक भारतीयाने आपल्या ‘लोकल’साठी ‘वोकल’ बनायचं आहे. लोकल ब्रँडला ग्लोबल ब्रँड बनवायचं आहे. केवळ लोकल प्रोडक्ट्स खरेदी करायचे नाही तर लोकल प्रोडक्ट्सचा अभिमानान प्रचारही करायचा आहे. आपला संपूर्ण देश हे करु शकतो. स्वदेशी वस्तूंच खरेदी करण्याचं मोदींनी आवाहन केलं आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. हा टप्पा संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यापूर्वी मोदींनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तसंच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांमध्ये काही बदल करण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.