आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त स्वाद वाढवत नाहीत तर ते स्वास्थ्यपूर्ण देखील आहेत. तुम्ही जिरा राईस आवडीने खात असाल पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का? भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारं मसाला जिन्नस म्हणजे जिरं. पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याची मदत होऊ शकते.
जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात.
- जिरे केवळ स्वयंपाकाची चव वाढवण्याचं काम करत नाही, तर निरोगी राहण्यासाठी गुणकारीसुद्धा आहे.
- जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन (Skin Infections) पासूनही रक्षण होतं.
- स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं.
- दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो.
- जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल.
- जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते.
- त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात.
- पोटात कधीही दुखू शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.
- लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही जिरा हे अधिक गुणकारी आहे.
- जर तुम्हाला उलटीसारखं वाटत असल्यास जिर चावून चावून खावं. त्वरित बरं वाटतं. जिऱ्याचा रस चघळल्याने उलटीसारखं वाटणं कमी होतं.
- मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.