WhatsApp Business: आता व्यवसाय करुया ऑनलाईन पद्धतीने

0
396

भारतासह जगभरात WhatsApp अत्यंत प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप हे अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्यामुळे व्हॉट्सअॅप लहान उद्योगांच्या विकासासाठी व्हॉट्सअॅप बिजनेसमार्फत अनेक सोयी पुरवत आहे.

WhatsApp Business हे एक Android आणि iPhone ॲप आहे जे निःशुल्क डाउनलोड करता येते, ते छोट्या व्यावसायिकांना गृहीत धरून निर्माण केले आहे. WhatsApp Business वापरून ग्राहकांशी संपर्क साधणे सोयीस्कर होण्यासाठी आम्ही अशी काही साधने पुरवीत आहोत ज्यामुळे संदेश आपोआप पाठविले जाणे, त्यांची वर्गवारी केली जाणे आणि काही संदेशांना तात्काळ प्रत्युत्तर पाठविणे हे शक्य होईल. ते मुद्दामच WhatsApp Messenger सारखे तयार केले आहे. त्यामुळे तुम्हाला मेसेंजरवर ज्याची सवय आहे, जसे की संदेश पाठवणे, फोटो पाठवणे तशा प्रकारेच तुम्ही ते वापरू शकता.

मुख्यतः व्हॉट्सअॅप बिजनेस हे अॅप छोट्या व्यवसायांच्या मालकांसाठी तयार करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही वेबसाईट किंवा इमेल अॅड्रेस यांसारख्या महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यासाठी एक बिजनेस प्रोफाइल तयार करू शकता. याचा वापर आपलं प्रोडक्ट दाखवण्यासाठी तसेच कॅटलॉग तयार करण्यासाठी करू शकता. यामाध्यमातून तुम्ही आपल्या प्रोडक्ट्सची व्हरायटी शेअर करू शकता, ऑर्डर घेऊ शकता.तसेच ग्राहकांच्या शंकांचं निरसनही या माध्यामातून करू शकणार आहात.

व्हॉट्सअॅप बिजनेस तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी मदत करेल. हे अॅप तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत संवाद करण्यासाठी आणि आपला ब्रँड विकसित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. दोन अॅप्समध्ये देण्यात आलेल्या सुविधांमध्ये फरक आहे. तसेच काही गोष्टी सारख्याही आहेत. परंतु, व्हॉट्सअॅप बिजनेसमध्ये बिजनेस प्रोफाइल आणि बिजनेस मेसेजिंग टूल यांसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ५० लाखांहून अधिक बिझनेस असे आहेत जे सक्रिय रुपात कस्टमर्सशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप बिझनेसचा वापर करत आहेत. हे बिझनेस अॅप नियमित वापरात येणाऱ्या व्हॉट्सअॅपहून पूर्णपणे वेगळं आहे जे सर्वसामान्य वापरत आहेत. व्हॉट्सअॅप बिझनेस आता अॅपलचा बिझनेस चॅट आणि फेसबुक मेसेंजरलाही तगडी टक्कर देत असल्याचे सिद्ध झाले आहे.

ॲप मध्ये प्रदान करत असलेली काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत :

  • व्यवसाय प्रोफाइल, असे प्रोफाइल ज्यामध्ये तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, व्यवसायाची माहिती, ई-मेल ॲड्रेस आणि वेबसाईट याची माहिती मिळेल.
  • आकडेवारी, तुमचे किती संदेश यशस्वीरीत्या पाठविले गेले, प्राप्त झाले आणि वाचले गेले याची महत्त्वाची माहिती सांख्यिकीच्या स्वरूपात पाहता येईल.
  • संदेश साधने, ग्राहकांना त्वरित उत्तर पाठविता येईल.