कैरी खाताय तर नक्की खा कारण त्यामुळे होतील हे फायदे

0
721

आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्य फायदेसुध्दा आहेत. मुळातच कैरी आंबट असल्याने इच्छा असतानाही अनेक जण सर्दी, खोकल्याच्या भीतीने या कैरीचे सेवन करणे टाळतात, पण बघायला गेल्यास प्रमाणात कैरी खाण्याचे शरीराला खूप फायदे होऊ शकतात. डोक्यावरील केसापासून ते त्वचे पर्यंत तसेच पोटाचे विकास, रक्तदाब, पचनक्रिया एकंदरीत सर्वच बाबतीत कैरी शरीराला गुणकारी सिद्ध होते. याच कैरीचे आपण कधीही न ऐकलेले काही गन आता फायदे आपण जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना कच्ची कैरी खाऊन शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्या असा सल्ला दिला जातो. कैरीच्या सेवनाने सुद्धा शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते.

कैरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

कैरीचे नियमित सेवन केल्याने आपले केस काळेभोर राहतात तसेच आपली त्वचा तजेलदार आणि मऊ होऊन त्वचा टवटवीत राहते. काही वेळातच आपल्याला चांगले वाटू लागते.

उलटी होणे किंवा जीव घाबरणे असा त्रास होत असल्यास कैरी आणि पादेलोण घेतल्याने या त्रासांपासून लगेच आराम मिळतो.

कच्च्या कैरीमधील अ‍ॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीची फोड उकळा. ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा. दुसर्‍यादिवशी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. फरक जाणवेल पिंपल्स जाण्यास मदत मिळते.

कुलिंग एजंट प्रमाणेच कच्ची कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे.

तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत कैरीचं सेवन आवर्जून करावं.

यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, सोबतच सौंदर्याची काळजी सुद्धा घेतली जाते. याचे सेवन डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत.

आपल्याला जास्त प्रमाणात घाम येत असल्यास तर कैरीचे पन्हे किंवा कैरीचे सेवन केल्यास या त्रासापासून मुक्तता मिळते.

मधुमेह असल्यास याचे सेवन केल्याने आपल्या शरीरामधील साखरेच्या प्रमानाला कमी करण्यास मदत मिळते. कैरीचे सेवन करून आपण शरीरामधील लोह पुरवठा परिपूर्ण करू शकता.

कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा.