मला भारताचे टॅलेंट आणि तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास – पंतप्रधान मोदी

0
302

(अनलॉकमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडस्ट्री असोसिएशन सीआयआयच्या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेला नक्कीच वेग येईल, आम्हाला कोरोनाविरूद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे, परंतु अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागेल. आज भारताने लॉकडाउनला मागे टाकत अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यात अर्थव्यवस्थेचा मोठा भाग उघडला आहे. बराचसा भाग आठ दिवसांनंतर उघडेल. अर्थव्यवस्थेच्या वाढीस सुरुवात झाली आहे.

जगात भारतीय उद्योगाला मोठी संधी आहे. भारत कुणावरही अवलंबून नाही. लोकल इंडस्ट्री ग्लोबल करण्याची वेळ आहे. कोरोना संकटाच्या काळात जीवनासह अर्थव्यवस्थाही वाचवायची आहे. अर्थव्यवस्था मजबूत करणार, आयात कमी करण्याचे प्रयत्न सुरु करणार असून मेड इन इंडियावर भर देणार असल्याचंही मोदींनी सांगितलं. देशातील अनलॉकमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल असंही मोदी म्हणाले.

125 वर्षांत सीआयआयला मजबूत करण्यासाठी योगदान देण्याऱ्यांना शुभेच्छा देतो. कोरोनाच्या या काळात अशाप्रकारचे ऑनलाइन इव्हेंट न्यू नॉर्मल होत चालले आहेत. ही मानवाची सर्वात मोठी ताकद असते. आपल्याला लोकांचे जीवन वाचवण्यासोबत अर्थव्यवस्थेला देखील मजबूत करायचे आहे. तुम्ही सर्व उद्योग जगतातील लोक शुभेच्छा पात्र आहात. मी गेटिंग ग्रोथ बॅकच्या पुढे जाऊन म्हणेल की, येस वी आर गेटिंग ग्रोथ बँक. अशा संकटप्रसंगी मी इतका आत्मविश्वासाने कसे बोलत आहे याबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल. याची अनेक कारणं आहेत. मला भारताचे टॅलेंट आणि तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास आहे.

मला देशाच्या क्षमतेवर, बुद्धीमत्तेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, याच जोरावर भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एका गती देण्यास मदत होणार असल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाने आपली गती भले ही कमी केली असेल परंतु आता भारत लॉकडाऊनला मागे टाकत अनलॉक फेसमध्ये आला आहे.

दुसऱ्या देशांच्या तुलना केल्यानंतर भारतात लॉकडाउनचा किती लाभ झाला हे माहीत होते. पण आता पुढे काय? उद्योग नेते म्हणून हा प्रश्न तुमच्या मनावर नक्कीच असेल की आपण काय करणार आहोत. आत्मनिर्भर भारत अभिनायाविषयी देखील तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील असा मला विश्वास आहे. ते स्वाभाविक आहे. कोरोनाविरुद्ध अर्थव्यवस्थेला पुन्हा मजबूत करने ही आपली मुख्य प्राधान्य आहे.