चक्रीवादळ म्हणजे काय? वादळाला नाव का दिली जातात?

0
639

कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट समोर येऊन उभं ठाकलं आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळ 3 जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर धडकणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.

तर आपण आज जाणून घेऊया चक्रीवादळ म्हणजे नक्की काय आणि ह्या वादळांना नावं कशी दिली जातात?

चक्रीवादळ म्हणजे काय?

समुद्रातील एका मध्यबिंदूभोवती म्हणजेच कमी दाबाच्या प्रदेशाभोवती जेव्हा चहूबाजूंनी वारे वाहण्यास सुरुवात होते, त्या वेळी वादळ तयार होते. चक्रीवादळ हे घड्याळ्याच्या दिशेने वरून खाली फिरते. समुद्राचे तापमान हे चक्रीवादळाच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे. वातावरणातील उष्ण आणि आर्द्र हवेच्या सतत होणाऱ्या पुरव‌ठ्यामुळे वादळाला पोषक वातावरण मिळते. वादळांची तीव्रता, वाऱ्याचा वेग, चक्राकार स्थितीचा आकार आणि त्यांचा दाब किती आहे, यानुसार त्याचे किती पडसाद उमटू शकतात, हे निश्चित केले जाते. चक्रीवादळे समुद्रातील पाण्याच्या उष्ण भागातील गरम वाफेमुळे निर्माण होतात. समुद्रावर जिथे २६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते, तो भाग वादळांच्या निर्मितीसाठी पोषक ठरतो.

हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.

चक्रीवादळांना नावे देण्याचा इतिहास:-

नागरिकांना हवामानाचा अंदाज आणि इशारा समजावा तसंच हवामान खातं आणि सामान्य नागरिकांमध्ये सोप्या पद्धतीनं संवाद व्हावा, यासाठी वादळांना नाव द्यायची पद्धत सुरु झाली.

समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले की हवामान खात्याकडून त्याचे नामकरण केले जाते. पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. सन १९०० च्या दरम्यान वादळांना स्त्रीलिंगी नावे दिली जायची. नंतर ती ” द्यायचे ठरवण्यात आले. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या चक्रीवादळाचे नाव ‘ए’ने सुरू व्हायचे. दक्षिण गोलार्धात तयार होणाऱ्या वादळांना पुल्लिंगी नावे देण्याची पद्धत सन १९००च्या अखेरीला सुरू झाली. अटलांटिक उष्णकटिबंधात तयार होणाऱ्या वादळांना १९५३नंतर ‘नॅशनल हरिकेन सेंटर’ने तयार केलेली नावे दिली जाऊ लागली. आता जागतिक हवामानशास्त्र संघटनेची (वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) आंतरराष्ट्रीय समिती चक्रीवादळांची नावे निश्चित करते.

ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण होतं. वादळांना नाव देण्याची पाश्चिमात्य देशांकडून सुरुवात झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावं देण्याचाही विचार असतो.नावं देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना असते.

एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो. तेव्हा हे एकाच देशाचं न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार असावं असं ठरलं.. महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले.भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. त्यात्या झोनमधील देशानी नावं सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळं येत जातील तसतशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना द्यायची हा नियम आहे. भारतानं २००४ सालात उत्तर हिंदी महासागरात येणार्‍या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरु झाली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क करतं. भारताच्या झोनमध्ये ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड हे देश आहेत. यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं.

प्रत्येक देशाने सुचविलेल्या वादळांच्या नावांची ८ गटात यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्यांदा पहिल्या यादीतील १ ते ८, नंतर दुसऱ्या यादीतील १ ते ८, अशाप्रकारे वादळांचं नामकरण केलं जातं. त्यानुसार यापूर्वी पाकिस्तानचे निलम, थायलंडचे फलिन, बांग्लादेशचे हेलेन, भारताचे लहर यांसारखी काही नावं वादळासाठी वापरण्यात आलेली आहेत.

वादळाचे नाव ‘ओखी’ कसे पडले?

  • ‘ओखी’ या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले आहे.
  • फयान वादळाचं नाव म्यानमारनं दिलं…
  • हुधुध ओमानं सुचवलं…
  • निलोफर पाकिस्ताननं सांगितलं…
  • नानौक बांगलादेशचं होतं