पाठदुखीचा त्रास होतोय तर हे नक्की करून पाहा

0
818

गेल्या दोन महिन्यापासून आपण सर्वजण घरीच आहोत नाही का. त्यात अजूनही लॉकडाउन वाढविण्यात आले आहे. आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दररोज काम करावे लागते आणि त्यासाठी आपण स्वतःही तंदुरुस्त राहायला पाहिजे. सध्या सर्वच ठिकाणी मोलकरीण येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे घरामध्ये महिलांना जास्त काम करावे लागत आहे. बऱ्याच महिलांना या काळात पाठीच्या दुखण्याबद्दल तक्रारी ऐकायला मिळत आहे. तर यासाठी आपण डॉक्टर निकिता शहा यांच्याकडून पाठीच्या दुखण्याचा त्रास कसा कमी होईल आणि त्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो ह्याबद्दल काही माहिती जाणून घेतली आहे.
आजकाल तरूण आणि प्रौढ लोकांमध्ये पाठीचा त्रास ही एक सामान्य समस्या आहे. त्यामागचे कारण आज आपले काम आहे अन्यथा खराब जीवनशैली. विशिष्ट ठिकाणी दीर्घ तास काम करणे, व्यायाम न करणे, योगासन न करणे आणि योग्य विश्रांती न घेणे आणि योग्य आहार न घेणे ही पाठीच्या दुखण्यामागची कारणे आहेत.

तर चला आपण जाणून घेऊया काय करावे आणि काय करू नये जेणेकरून पाठदुखीचा त्रास आपल्याला उद्दभवणार नाही ह्याबद्दल:

काय करावे:

  • भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि विश्रांती घ्या.
  • नियमित व्यायाम व योगासन करावे.
  • काम करत असताना मध्ये मध्ये थोडे थांबून स्ट्रेचिंग करावे
  • काम करत असताना ताणतणावात राहू नये
  • चालताना, बसताना, उभे’असताना तुमच्या शरीराची मुद्रा सरळ ठेवा
  • जमिनीवरील वस्तू उचलतांना कंबरेत न वाकता, गूढघ्यांवर वाकावे.
  • पाठदुखी जास्त असेल तर व्यायाम करणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरिपी, व्यायाम करुन घ्यावा

काय करू नये:

  • आपल्या मणक्यावर विनाकारण ताण देऊ नका.
  • खूप वेळा अपेक्षेपेक्षा जास्त वजन असलेली गोष्ट उचलू नका
  • एकाच पोझिशन मध्ये जास्त वेळ बसू नये किंवा उभे राहू नये
  • पाठीच्या दुखण्यापासून दूर रहाण्यासाठी हा काही अर्गोनोमिक सल्ला आहे जो आपण दररोजच्या जीवनात लागू करावा.

तर योग्य ती काळजी घ्या आणि तणावमुक्त आयुष्य जगा.