World Bicycle Day:सायकल चालवू ,निरोगी राहू

0
436

जागतिक सायकल दिवस. एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सायकल दिन साजरा केला जातो. हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजच्या काळात सायक्लिंगला फार महत्त्वं आलेलं आहे. शरीरस्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठीही सायक्लिंग मदत करतं.

जगातील काही देशांमध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये नेदरलँड देशाचा उल्लेख अवश्य करावा. नेदरलँडमध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे.

इतिहासातील पहिली सायकल

ही झाली आजची बाब… परंतु सायकलचा प्रवास 223 वर्षे जुना आहे. सायकल बनविण्यामागचा पहिला विचार साधन आणि सुविधा हा होता आणि आज तो आरोग्याशी जुळला आहे. 1817 मध्ये पहिल्यांदा जर्मन ड्यूक शासकाच्या सेवेत गुंतलेले सरकारी अधिकारी कार्ल वॉन डॅरेस यांनी जगातील पहिली दुचाकी सायकल बनवली होती. त्यालाच सायकल म्हटले गेले आणि त्यावेळी त्याचे नाव ठेवले गेले – ड्रॅसिनी. याचा अर्थ असा हलकं वाहन जे आपणास मोटारविना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊ शकेल.

 सायकलविषयीच्या कधीच न ऐकलेल्या काही इन्टरेंस्टिंग फॅक्ट

  • अमेरिकेतील जॉन हॉवर्ड हे सर्वाधिक वेगाने चालवणारे सायकलवीर आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून सायकलस्वारीने ते प्रत्येक तासाला १३३.७५ किमी अंतर गाठतात.
  • नियमित सायक्लिंग केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार जडत नाहीत. सायक्लिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील चरबीची पातळी कमी होते.
  • नियमित सायक्लिंग करण्याने स्नायंची सहनशक्तीही बळावते.
  • मधुमेह प्रकार १ आणि २ अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी सायक्लिंग वरदान आहे.
  • मानवी प्रगती आणि विकासासाचं सायक्लिंग हे प्रतिक असल्याचं मानलं जातं.
  • सायक्लिंगमुळे माणसाच्या चालण्याचा वेग तीनपटीने वाढतो.
  • सर्वाधिक लांबलाचक सायकल २० मीटरची आहे. या सायकलीवर तब्बल ३५ माणसं बसू शकतात.
  • नेदरलँडमध्ये पंधरा वर्षांवरील आठपैकी सात लोकांकडे सायकल असतेच.
  • युकेमध्ये २० लाखांपेक्षा जास्त सायकली चालवल्या जातात.
  • न्युयॉर्कमध्ये १० टक्के कामं सायकलीवरून केली जातात.
  • जर जगात तीन टक्क्यांनी सायकिलंगचे प्रमाण वाढले तर, जगात होणारे अपघात ५० टक्क्यांनी कमी होतील, असं म्हटलं जातं.

‘जागतिक सायकल दिना’ निमित्तानं सायकल आणि निरोगी आयुष्याचं नातं किती घट्ट आहे हे जाणून घेऊ.

लहान मुलांसाठी फायदेशीर
जी मुलं चालत किंवा सायकल चालवत शाळेत जातात त्यांना स्थूलपणाचा धोका हा कमी असतो. जी मुलं शालेय उपक्रम, खेळ यात सहभागी होतात आणि जी मुलं चालत किंवा सायकल चालवत शाळेत जातात अशा मुलांमध्ये स्थूलपणा जाणवत नाही. ही मुलं कधीही लठ्ठपणाची शिकार होत नाही, असं बीएमसी पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे.

२. स्थूलपणाचा धोका कमी
वरील बाब ही मोठ्या व्यक्तींनादेखील लागू पडते. सायकल चालवल्यानं स्थूलता कमी होते. वजन घटवण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. दररोज ठराविक वेळ सायकल चालवल्यानं ०.७५ किलो वजन कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

३. रहा फिट
सायकलिंग केल्यामुळे फिट राहण्यास मदत होते. सायकलिंगकडे आता एक प्रकारचा व्यायाम म्हणूनच पाहिले जात आहे.

४. हृदय रोगाचा धोका कमी
सायकलिंगमुळे हृदय विकाराचा धोकाही कमी होतो, असंही एका संशोधनातून समोर आलं आहे. दररोज २० मिनिटे सायकल चालवल्यानं हृदय विकाराचा धोका हा ५० % नं कमी होतो असं समोर आलं आहे.

५. पचनक्रिया सुधारते
सायकल चालवल्यानं पचनक्रियाही सुधारते.

चला तर मग आयुष्यात एकदातरी सायकल सफारीची मजा घेऊ आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करू.