वरुणराजा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. चक्रीवादळ सोबत पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. आपण पावसाळ्यात छत्री किंवा रेनकोट वापरून स्वतःची काळजी जशी घेतो तशी गॅझेटसचीही काळजी घेतो का? त्यासाठीच आपले गॅझेट पावसात भिजू नये यासाठी आपण काय करावे? तसेच ते भिजल्यावर काय उपाययोजना करू शकतो याबाबत काही माहिती तुम्हाला देत आहोत.
पावसापासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यायची काळजी. आजकाल मोबाईल ही गोष्ट सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची झाली आहे. पावसा-पाण्यात एखादा कठीण प्रसंग आला अथवा एखाद्या ठिकाणी अडकण्याची वेळ आली तर कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी मोबाईल हा एक दूतच आहे असं म्हणावं लागेल. शिवाय आजकाल अनेकांची कामे ही केवळ एका मोबाईलवर क्षणभरात पूर्ण होत असतात. अशा बहुपयोगी मोबाईलची काळजी पावसात घेणं फार गरजेचं आहे
पावसात मोबाइलला सर्वात जास्त सांभाळावे लागते. कारण मोबाइल आपल्या बरोबर असतो. पावसाळ्यात मोबाइलसाठी एक प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचे पाऊच आवर्जून ठेवावे. शक्यतो आपल्या पँटच्या खिशात मोबाइल ठेवू नका. पाऊस पडत असेल त्यावेळेस तो आपल्या बॅगमध्ये ठेवणेच पसंत करा. पाऊस पडत असताना जर मोबाइलवर बोलायचे असेल तर हेडफोंसचा वापर करा. मोबाइल बाहेर काढू नका. पावसाळ्यात खास स्मार्टफोनसाठी वॉटरप्रूफ कव्हर्स बाजारात येतात. यांचाही तुम्ही वापर करु शकता. तसेच यावेळी तुम्ही ब्लूटूथचा वापर करु शकता. म्हणजे पावसामध्ये मोबाईल बाहेर काढायचे काही टेंशनच नाही.
लॅपटॉप हा नियमित त्याच्या बॅगमध्येच ठेवा. त्यासाठीही प्लास्टिक पिशवीचा वापर केल्यास उत्तम राहील. एवढी काळजी घेऊनही लॅपटॉप असो, मोबाइल किंवा महागडा कॅमरा जर तो भिजला तर पहिली गोष्ट करा की, तुमचं गॅझेट बंद करा. त्यामुळे विद्युतप्रवाह आतल्या सॉकेटपर्यंत पोहचणार नाही. आणि बरंचसं नुकसान टळेल. तुमच्या गॅझेटचे भाग सुटे होत असतील तर आधी ते सुटे करून घ्या. मेमरी कार्ड, सिम कार्ड, मागचं पॅनल इ. आता हे सुटे भाग स्वच्छ व मऊ कपड्यावर मोकळ्या जागेत ठेवा.
गॅझेटच्यावरचं पाणी साफ केलं पण आतल्या पाण्याचं काय? त्यातील जास्तीत जास्त पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करा. यानंतर टॉवेल, टिश्यू किंवा वर्तमानपत्राचा कागद घेऊन तुमचं गॅझेट काळजीपूर्वक पुसून घ्या. वेगळी अशी एक ट्रिक म्हणजे तांदळाचा वापर करा. तांदळात गॅझेट पुरून ठेवा. एका भांड्यात स्वच्छ निवडलेले तांदूळ घ्या. तुमचं गॅझेट त्या तांदळात पुरून ठेवा. भांड्यावर झाकण लावून बंद करा. या ट्रिकने पूर्ण भिजलेल्या मोबाईलला कोरडं होण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण तुमच्या गॅझेटची परिस्थिती याहून ओलावा शोषून घेतो.
नाहीतर पावसासाठी वॉटरप्रूफ बॅगचा वापर करावा, जेणेकरून तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोष्टी त्या बॅगेत ठेवू शकाल. जेणेकरून त्या गोष्टी भिजणारही नाहीत आणि खराबही होणार नाहीत