सॅमसंगचा गॅलेक्सी A21s स्मार्टफोन आज भारतात झाला लॉंच

0
410

सॅमसंगचा Galaxy A21s स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या फोनचा टीझर याआधीच जारी केलेला आहे. फोनच्या टीझरवरून माहिती पडते की, या फोनची बॅटरी लाइफ मोठी असणार आहे. तसेच या फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले देण्यात येणार आहे. सॅमसंगच्या या फोनची अनेक जणांना प्रतिक्षा होती. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये infinity-O डिस्प्ले असून याद्वारे युजर्सना दर्जेदार व्हिजुअल्सचा अनुभव मिळतो. तसेच या फोनमध्ये दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.

किंमत :-
Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे. 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत कंपनीने ठेवली आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन आजपासून सर्व रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.

सॅमसंग गॅलेक्सी A21s: बेसिक फिचर्स:-

  • सॅमसंग गॅलेक्सी A21s हँडसेटमध्ये 6.5 इंचच्या एचडी+ (720X1600 पिक्सल) इनफिनिटी-ओ डिस्प्ले आहे, तर 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे.
  • हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI वर काम करतो. फोनमध्ये ऑक्ट-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेजला 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
  • सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये चार रियर कॅमेरे आहेत. यामध्ये f/2.0 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चर असणारा 8 मेगापिक्सल का अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल का डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल का मायक्रो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चर असणारा 13 मेगापिक्सलचा सेंसर उपलब्ध आहे.
  • तसेच 5,000 एमएएचची बॅटरी आहे. ही 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तसेच फिंगरप्रिंट सेंसर आहे. हे फेशियल रिकग्निशन टेक्नोलॉजीही यामध्ये आहे.