India-China clash: ५०० चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा CAIT चा निर्णय

0
376

लडाख सीमेवर (Ladakh Border) वर भारत-चीन संघर्षामुळे (India-China Rift) व्यापारी संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने देशामध्ये चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता CAIT ने 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी जाहीर केली आहे. लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापाऱ्यांनी टीकी केली आहे. चीनला संधी मिळाल्यावर ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये तब्बल 45 वर्षांनी एवढा मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला.

चीनची भूमिका देशहिताविरोधात असल्याने CAIT ने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कॅटने ‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ या अभियानाअंतर्गत 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 3000 पेक्षा जास्त उत्पादकांचा समावेश आहे, जे चीनमध्ये तयार होतात आणि भारतात आयात केले जातात.

सीएआयटीने म्हटले आहे की, 13 अरब डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंतची चीनी बनावटीच्या वस्तींची आयात डिसेंबर 2021 मध्ये घटवण्यात यावी. भारतात आज घडीला प्रतिवर्ष 5.25 लाख कोटी रुपये म्हणजेच साधारण 70 अब्ज डॉलर किमतीच्या चीनी वस्तू आयात होतात. सीएआयटीने एका प्रतिक्रियेत सांगीतले की, पहिल्या टप्प्यात सीएआयटीने वस्तुंच्या 500 पेक्षाही अधिक श्रेणी निवडल्या आहेत. ज्यात 3,000 पेक्षाही अधिक वस्तूंचा समावेश आहे. ज्या भारतातही बनवल्या जातात परंतू स्वस्ताईच्या नावाखाली चिनमधून आयात केल्या जातात.

कोणत्या वस्तूंवर CAIT चा बहिष्कार

या अभियानाच्या पहिल्या चरणात कॅटने या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. या 500 कॅटेगरीमध्ये समावेश असणाऱ्या 3000 वस्तूंमध्ये रोजच्या वापरातील वस्तू, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्सटाइल, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, गारमेंट, स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, लगेज, हँड बॅग, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आयटम, इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अपॅरल, खाण्याच्या काही वस्तू, घड्याळं, काही प्रकारचे दागिने,, वस्त्र, स्टेशनरी, कागद, फर्नीचर, लायटिंग, हेल्थ प्रोडक्ट्स, पॅकेजिंग प्रोडक्ट, ऑटो पार्ट्स, यार्न, फेंगशुई आयटम्स, दिवाळी तसंच होळीसाठी लागणारं सामान, चश्मा, टेपेस्ट्री मटेरियल यांचा समावेश आहे.

सीएआयटीने आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, या वस्तुंच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामग्रिची गरज नाही. जरी पडली तरी भारत ती सामग्री उभा करण्यास सक्षम आहे. भारतात निर्माण झालेल्या वस्तू चिनी वस्तूंच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण असू शकतात. त्या वापरल्याने भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल.