कोव्हिड 19 वर पतंजलि कडून आयुर्वेदिक औषध लाँच

0
303

(3 दिवसांत 69% रूग्ण बरे होत असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा)

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सामान्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. अशामध्ये औषधं शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅलोपॅथीच्या सोबतीने होमिओपॅथी आणि आता आयुर्वेदीक उपचारांनाही गती दिली जात आहे. आज योग गुरू बाबा रामदेव यांच्या संस्थानच्या पतंजली कडून कोरोना वर पहिलं आयुर्वेदीक औषध कोरोनिल लॉन्च करण्यात आलं आहे. आज दुपारी 12 वाजता हरिद्वार येथील पतंजलि योगपीठ मध्ये हे औषध लॉन्च झाले. यावेळेस डॉक्टर, संंशोधक सोबत बाबा रामदेव देखील उपस्थित होते. कोरोनिल’ असं या औषधाचं नाव असून कोरोनाबाधितांना उपचारा दरम्यान हे औषध अत्यंत गुणकारी असल्याचं ते म्हणत आहेत.

या औषधाच्या क्लिनिकल केस स्टडीमध्ये 280 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. 100 लोकांवर क्लीनिकल कंट्रोल ट्रायल करण्यात आली. 3 दिवसांच्या आत 69% रुग्ण हे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले. 7 दिवसांच्या आत 100% रुग्ण बरे झाल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे.

रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.

या औषधी वनस्पतींचा आहे समावेश: बालकृष्णांच्या म्हणण्यानुसार, ‘दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांमध्ये या औषधाबद्दल क्लिनिकल चाचण्या घेतलेल्यांमध्ये 100 टक्के निकाल पाहिले गेले आहेत.

हर्बल औषधाचे नाव हे कोरोनिल असणार आहे. हे औषध आयुर्वैदिक साधनापासून तयार करण्यात आले आहे. या औषधाचे सेवन केल्यानंतर 4 ते 5 दिवसात फरक पाहण्यास मिळणार आहे. पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून 280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. यात सात दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण हे बरे झाले होते. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनिल हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.