भज्जी बर्थडे स्पेशल: हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला आणि स्टार झाला

0
303

भारतीय क्रिकेटमध्ये टर्बनेटर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिरकीपटू हरभजन सिंगचा आज ४०वा वाढदिवस (Happy Birthday Harbhajan Singh )आहे. जवळपास दोन दशके भारतीय संघाकडून खेळेल्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा शानदार विजय मिळवून दिले आहेत. गेल्या काही काळापासून भारतीय संघातून संधी मिळाली नसली तर अद्याप मैदानावर परतण्याची हरभजनची इच्छा आहे.

१८ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरही कुटुंबाला अर्थिक सहाय्य मिळावे म्हणून क्रिकेट सोडून कॅनडाला जाऊन ट्रक ड्राईव्हर बनण्याचा विचार त्याने केला होता. पण अचानक त्याची २००१ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्यानेही आलेली संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्या ३ सामन्यांच्या मालिकेत तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात कधीच मागे वळुन पाहिले नाही. तो क्रिकेटपटू म्हणजे आज भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये गणला जाणारा हरभजन सिंग उर्फ ‘भज्जी’.

दरम्यान, भज्जीने खात्यात ऑफ-स्पिनरच्या रूपात तिसऱ्या सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत तर भारतीय म्हणून सर्वाधिक बळी मिळवले आहेत. 2001 मध्ये अनिल कुंबळे च्या दुखापतीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारताच्या संघात हरभजनचा समावेश केला होता. 38 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हरभजनने आपला शेवटचा वनडे सामना मार्च 2016 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. हरभजनने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट घेतल्या. तर २ शतक आणि ९ अर्धशतकांसह २ हजार २२५ धावा केल्या. वनडेत त्याने २३६ सामन्यात २६९ विकेट, तर २८ टी-२० सामन्यात २५ विकेट घेतल्या.

हरभजनने १९९८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघाच्या २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजेतेपदाच्या संघात हरभजनचा समावेश होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती एका कसोटी मालिकेने… ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेनंतर हरभजन सिंगचे आयुष्यच बदलू गेले. ऑस्ट्रेलियाचा संघ २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. तीन कसोटी मालिका खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग १५ कसोटी सामने जिंकले होते. जागतीक क्रिकेटमध्ये हा एक विक्रम होता. तेव्हा भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने हरभजनला संघात घेण्याचा निर्णय घेतला. कारण अनिल कुंबळे त्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेआधी हरभजनची कामगिरी फार चांगली नव्हती. पण गांगुलीने त्याच्यावर विश्वास दाखवला.

त्या संधीचे सोने करत हरभजनने ३ सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या. द्रविड-लक्ष्मणच्या भागीदारीमुळे प्रसिद्ध असलेल्या कोलकाता कसोटीत हरभजनने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे. त्याने त्या सामन्यात पहिल्या डावात पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं. त्यावेळी तो कसोटीत हॅट्रिक घेणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता. भारताने मालिका २-१ ने जिंकली. चेन्नईत हरभजनला सामानावीर आणि मालिकेत ३२ विकेट घेतल्याबद्दल मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत भज्जीने कोलकाता कसोटीत हॅटट्रिक घेतली होती. भारतीय कसोटी क्रिकेटमधील ही पहिली हॅटट्रिक ठरली. या एका मालिकेने तो स्टार झाला आणि त्यानंतर त्याने मागे फिरून पाहिले नाही.

यानंतर हरभजन भारताच्या संघातील नियमित सदस्य बनला.तो आणि अनिल कुंबळेची जोडी घातक ठरायला लागली. त्यात सुरुवातीपासून २०१०च्या दशकाच्या बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाला हरभजन नडायला लागला. मात्र,ते जितके आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तितकाच आपल्या मैदानावरील वागणुकीसाठी देखील तो तितकाच प्रसिद्ध आहे. तो त्यांनी केलेले स्लेजिंगचे जशास तसे उत्तर देऊ लागला. एकदा तर बंगलोरला कसोटी सामन्यात तो फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असलेला डॅरेन लेहमन त्याला सातत्याने काहीतरही बोलून डिवचत होता. त्यावेळी हरभजनने लेहमनकडे पाहिले आणि त्याच्या पोटाकडे पाहून तो त्याला सरळ म्हणाला, ‘तू प्रेग्नंट आहेस का?’ हरभजनचे असे विचित्र वाक्य ऐकून नंतर लेहमन काही बोलला नाही. हरभजनचे जशास तसे बोलणे आणि मग त्वेषाने खेळणे पाहून मॅग्राही म्हणाला होता की त्याला डिवचलं की तो जास्त चांगला खेळतो, त्यामुळे आता त्याला जास्त स्लेज करण्यात अर्थ नाही.