माही मार रहा है; सुपरमॅन धोनी

0
298

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा काल वाढदिवस होता…त्याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंडच्या (तेव्हा बिहार) रांचीमध्ये झाला होता. भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या लाखो क्रिकेट चाहत्यांना धोनीनं त्याच्या खेळातून निखळ आनंद दिलाय… क्रिकेटच्या मैदानावर धोनी असेल तर सगळं मैदान त्याच्याच नावानं गरजच असतं… पुन्हा ते कधी पाहायला मिळणार हे माहिती नाही… पण धोनीनं आजवर जे काही भारतीय क्रिकेटला दिलंय ते शब्दांत सांगणंच कठीण आहे.

झारखंडमधील रांची जवळलील एका छोट्याशा गावातून येऊन धोनीने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघितले आणि ते धाडसाने पूर्ण केले. धोनीने अगदी लहान वयातच क्रिकेट मधील देव समजल्या जाणाऱ्या मास्टब्लास्टर सचिन तेंडुलकर ला आपले प्रेरणास्थान मानले.

भारतीय रेल्वेमध्ये टी.सी म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्याने केलेल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवला.

धोनी हा विकेटकिपर म्हणूनही तेवढाच खास आहे… खरं तर विकेटकिपर म्हणून कामगिरी करतानाही तो असं काही करतो त्यातूनही तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो… धोनीनं करिअरची सुरुवात केली तेव्हा धोनीकडून काही चुका होत होत्या… पण त्यानंतर त्यानं विकेट किपिंगमध्ये अशी काही सुधारणा केली की, त्याची बरोबरी करणं अजूनही कुणाला शक्य नाही… त्याच्या काही ट्रिक्स तर अशा आहेत की त्या कुणाला कधीही वापरणं शक्य होणार नाही… तो मागे उभा असल्यानंतर फलंदाज बाहेर निघायची शक्यतो हिम्मत करत नाही, आणि तर तो बाहेर निघाला तर त्याला बॅटला चेंडू लावण्याशिवाय पर्याय नाही… कारण तसं झालं नाही आणि चेंडू मागे धोनीच्या हातात गेला तर त्याला पर पॅव्हेलियनमध्ये परतण्याशिवाय पर्याय नाही… धोनीची नजर एवढी परफेक्ट असते की डीआरएसमध्ये धोनीनं घेतलेला निर्णय किंवा त्याचा अंदाज शक्यतो चुकूच शकत नाही… त्यामुळं गमतीनं डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टीमही म्हटलं जातं.

कॅप्टन कूल :

धोनी म्हणजे आपला कॅप्टन कूल… आता धोनी कॅप्टन नाही असं अनेकजण म्हणतील… पण त्यानं काय होतंय… धोनी हा कायम सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी कायम कॅप्टन कूलच असेल… आजही तो जेव्हा मैदानावर असेल तेव्हा कर्णधार कोणीही असला तरी सगळ्यांच्या नजरा माहीवरच असतात… अगदी जो अधिकृत कर्णधार आहे तोही धोनीचे सल्ले घेताना दिसतो… धोनीही कधीतरी अचानक कर्णधारासारखा वागायला लागतो… हेही आपण पाहिलंय… त्यात कर्णधार म्हणून धोनीनं भारताला क्रिकेटमध्ये ते सर्वकाही मिळवून दिलंय जे भारताला मिळवायचं होतं… मग टी 20 विश्वचषक असेल 50 षटकांचा विश्वचषक असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा कसोटीतील सर्वोच्च स्थान असेल… सर्वच बाजुंनी धोनीनं क्रिकेट चाहत्यांवर आनंदाचा वर्षाव केलाय…

अशा आपल्या सर्वांच्या माहीचा वाढदिवस… सोशल मीडियावर धोनीचे चाहते त्याचा वाढदिवस अगदी जोमात साजरा करत आहेत… पण धोनी मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणं अगदी कूल राहून कुठतरी शांततेत मुलीबरोबर जीवनाचा आनंद घेत असेल… कारण त्याच्या खेळातूनही त्यानं कायम सर्वांनाच केवळ आनंदत दिलाय…

धोनीचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे टीम जिंकल्यावर सगळं श्रेय तो त्याच्या टीम प्लेअर्सला द्यायचा तर पराभवाचं श्रेय मात्र स्वत:कडे घ्यायचा. आता त्याच्याच पायावर पाय ठेवून विराटही पुढे चालला आहे.भारताचे पुर्व कोच ग्रेग चॅपल आणि गॅरी कर्स्टनही धोनीच्या विरोधात कधी गेले नाहीत.

मिस्टर हेलिकॉप्टर हे नाव धोनीला युवराज सिंह याने दिलं होतं. अवघ्या २३व्या वर्षी धोनीने भारतीय क्रिकेट संघात प्रवेश केला. झारखंड राज्यातून राष्ट्रीय क्रिकेट संघात प्रवेश करणारा तो पहिला खेळाडू ठरला. धोनीचा अतित्कृष्ट खेळ बघता अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू संघात असतानाही कप्तानपदाची जबाबदारी त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११चा वन-डे वर्ल्ड कप, २००७चा टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.