हॅपी बर्थडे लिटिल मास्टर: सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडणारा महान भारतीय फलंदाज

0
350

भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर 10 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. क्रिकेट विश्वात फक्त काही खेळाडूंच्या नावासमोर ‘महान’ हा शब्द जोडला गेला आणि गावस्कर यांचा या महान खेळाडूंमध्ये समावेश केला जातो. क्रिकेट विश्वात ज्यांची ओखळ द डॉन अशी केली जाते असे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे म्हणेज साधी सुधी गोष्ट नव्हे. भारताच्या एका फलंदाजाने आपली एकाग्रता आणि सर्वोत्तम तंत्र याचा वापर करून ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला होता. गावसकर यांनी करिअरमध्ये जगातील सर्वोत्तम आक्रमक गोलंदाजीचा सामना केला.

१९७१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या गावसकरांनी कसोटीत १० हजारापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारे ते पहिले खेळाडू. वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्यांनी ७७४ धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला. गावसकर यांनी कारकिर्दीत ३५ कसोटी शतके ठोकली. त्यांचा हा विक्रम २००५ पर्यंत अबाधित होता. सलग तीन डावात शतक काढण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. गावसकर ७० ते ८० या दशकात बराच काळ भारतीय संघाचे कर्णधारही होते. भारताला १९८३ सालचा विश्वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. यष्टीरक्षक सोडून कसोटीत १०० हून जास्त झेल घेण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

१९८० साली विस्डेनने क्रिकेटर ऑफ द इअर साठी निवड केली. २००९ साली आयसीसी हॉल ऑफ द फेममध्ये त्यांचा समावेश झाला. तर २०१२ साली सीके नायडू लाइफ टाइम अचव्हमेंट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवीले आहे. लिटिल मास्टर’च्या नावाने त्यावेळेला सुनील गावस्कर प्रसिद्ध झाले होते.

सुनील गावस्कर यांचे रेकॉर्ड्स

गावस्कर यांना नेहमीच 10,000 कसोटी धावा करणारा पहिला क्रिकेटपटू म्हणून संबोधले जाते. 1987 पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या अखेरच्या कसोटी मालिकेमध्ये गावस्कर यांनी अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 63 धावा केल्या आणि दहा हजारांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज ठरले.

2. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 शतके ठोकण्याचा विक्रम गावसकर यांच्या नावावर होता, जो नंतर सचिनने मोडला. गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतकं झळकावली होती.

3. गावस्कर भारताचे सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आहे. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पणातील कसोटी मालिकेत सर्वाधिक 774 धावा केल्या.

4. आतापर्यंत ते 2 स्थळ- पोर्ट ऑफ स्पेन आणि वानखेडे स्टेडियमवर सलग चार शतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.

5. आपल्या पदार्पणाच्या सामान्यापासून गावस्कर यांना वेस्ट इंडीज खेळायला आवडायचे. विंडीज हे 70 आणि 80 च्या दशकात अजिंक्य ठरले पण गावस्कर यांनी त्यांच्या विरुद्ध खेळलेल्या 27 सामन्यात 13 शतकं ठोकली

गावस्कर सरांबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी:

१. काकांनी तारलं सुनील गावस्करांना
भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरांसारखा उत्कृष्ट खेळाडू मिळालाच नसता जर त्यांच्या जन्मावेळी त्यांचे काका हॉस्पीटलमध्ये नसते. कारण जन्मानंतर सुनीलजी एका दुसऱ्या नवजात मुलासोबत बदली झाले होते. मात्र त्यांच्या काकांनी बाळाच्या डाव्या कानाजवळील तीळ ओळखले आणि त्यामुळे सुनीलजी पुन्हा त्यांच्या घरातल्यांना मिळाले.

२. ‘गावस्कर’ एक क्रिकेटमय कुटुंब
सुनील गावस्करांच्या कुटुंबात सुनील हे एकटेच क्रिकेटर नसून त्यांचे मामा माधव मंत्री यांनीही भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. याचसोबत गावस्करांचा मुलगा रोहनने ११ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याचसोबत भारताचे माजी फलंदाज जी. आर. विश्वनाथ हे गावस्कर यांचे मेहूणे आहेत. गावस्करांची बहीण, नूतन या देखील मुंबईतील पहिल्या महिला क्लबतर्फे क्रिकेट खेळल्या होत्या.

३. गावस्कर होणार होते ‘कुस्तीपटू’
गावस्कर क्रिकेटर बनण्याआधी कुस्तीपटू बनू इच्छित होते. प्रसिद्ध कुस्तीपटू मारुती वडार यांचे ते मोठे चाहते होते. मात्र त्यांनी त्यांचे मामा माधव मंत्री यांना भारताकडून क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्यांनीही क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला.

. गावस्करांची भीती
आपल्या हातातील बॅटने सर्व बॉलर्सना घाबरवून सोडणारे गावस्कर मात्र घाबरतात ते कुत्र्याला. इंग्लिश अष्टपैलू खेळाडू इयन बोथम यांनी गावस्करांना कुत्र्याची भीती दाखवून एका टेलीफोन बुथमध्ये डांबून ठेवले होते.

५. मोठ्या पडद्यावरही झळकले होते गावस्कर
गावस्कर यांनी १९७४ साली आलेल्या ‘सावली प्रेमाची’ मराठी चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. त्याचसोबत त्यांना १९८८ साली नसीरुद्दीन शाहच्या चित्रपट ‘मालामाल’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते.

६. बालपणीचे स्वप्न केले पूर्ण
गावस्करांचे लहाणपणापासूनच स्वप्न होते की, कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजवर विजय मिळवायचा. गावस्करांनी १९७१ च्या दौऱ्या दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. पहिला सामना दुखापतीमुळे ते खेळले नाही, मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात त्यांनी ६५ आणि ६७ धावा केल्या, विशेष म्हणजे या सामन्यात त्यांच्या या विजयी धावा ठरल्या.

अशा काळात जेव्हा जगभरातील खेळपट्ट्या फलंदाजांसाठी अनुकूल नसायच्या तेव्हा गावस्कर यांनी आपले उत्कृष्ट कौशल्याचा आणि निर्भय वृत्तीने गोलंदाजांवर राज्य केले. उजव्या हाताच्या फलंदाजाने खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात फलंदाजीचे अनेक विक्रम नोंदवले आहेत. गावस्कर यांनी नोव्हेंबर 1987 मध्ये खेळाला निरोप देण्यापूर्वी 16 वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली होती. आज त्यांच्या वाढदिवशी देसी डोक कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.