प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

0
256

बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली.

१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी वाढ झाली आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकनसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलैपर्यंत छायाप्रतीसाठी १७ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

मंडळाच्या या अधिकृत संकेतस्थळांवर होणार निकाल जाहीर

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.ord

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर आकडेवारी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.