सोनू सूद पुन्हा आला धावून; आता पोलिसांना केली मदत

0
622

करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो स्थलांतरी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. या कामासाठी त्याचं भरभरून कौतुकही झालं. सोनू आताही या कठीण काळात अनेक गरजूंची मदत करत आहे. मजुरांनंतर आता सोनू महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला धावून आला आहे.

सोनू सूदने काल गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड भेट दिल्या आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याची ही मोलाची मदत पाहून ट्विटरच्या माध्यमातून त्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटरवर सोनूसोबतचा फोटो शेअर करत त्याचे आभारही मानले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘आमच्या पोलीस कर्मचार्‍यांना २५ हजार फेस शिल्ड देऊन केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी सोनू सूद यांचे आभार मानतो.’ देशमुख यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांनीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले होते.

https://help.twitter.com/en/twitter-for-websites-ads-info-and-privacy

देशमुख यांच्या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, ‘तुमच्याकडून झालेलं कौतुक ऐकून फार सन्मानीत झाल्यासारखं वाटत आहे. माझे सर्व पोलीस बांधव हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामाच्या मोबदल्यात मी त्यांच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. जय हिंद’