चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; मनी हाइस्ट सिझन ५ येतोय लवकरच भेटीला

0
271

(मनी हाइस्ट’चा चौथा सिझन अत्यंत निर्णायक वळणावर येऊन संपला होता. त्यामुळे पाचव्या सिझनची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात लॉकडाऊन असताना घरात बसलेल्यांसाठी ऑनलाईन मनोरंजन हे जास्त उपयोगी ठरत आहे. मनी हाइस्ट या वेबसीरिजला लॉकडाऊनचा चांगलाच फायदा झाला आहे. भारतातील प्रेक्षकांमध्येही या सीरिजबाबत चांगलंच वेड पाहायला मिळत आहे.या मनी हाइस्टमध्ये एक प्रोफेसर आहे अर्थात तो सर्वांचा मास्टरमाइंड ‘The Professor’ म्हणून ओळखला जातो. हा सगळा चोरीचा डाव रचण्यामागे त्याला सगळ्यांचा बॉस म्हणायला हरकत नाही. अशी ही व्यक्ती, आसपासच्या सर्वोत्तम खास निवडलेल्या आठ इतर लोकांना एकत्र घेऊन येते, यातील प्रत्येक आठ व्यक्तीची ओळख ही त्यांच्या नावाने नाही तर टोपण नावाने म्हणजेच शहरांच्या वेगवेगळ्या नावावर ठेवलेली असतात जसं की टोकियो, रिओ, बर्लिन आणि या गटाला काही महिने या दरोड्याचा तयारीसाठीचा अभ्यास प्लॅनिंग प्रोफेसर कसं घेतात आणि पुढे रॉयल मिंटवर दरोडा त्यानंतर चोर पोलीस असा खेळ सुरू होतो.

‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पाचव्या सिझनची घोषणा करत यामध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो मास्क लावलेला असून सेल्फी काढताना पाहायला मिळत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन अत्यंत निर्णायक वळणावर येऊन संपला होता. त्यामुळे पाचव्या सिझनची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात हा चौथा सिझन प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.