अखेर ठरलेच; आयपीएल 2020 चा संग्राम १९ सप्टेंबरपासून

0
240

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र होतं. क्रीडा जगतालाही याचा फटका बसला होता. अनेक स्पर्धा आणि क्रिकेटचे सामने कोरोनाच्या भीतीमुळं रद्द करण्यात आले होते. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं असून आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अखेर आयपीएलच्या (IPL 2020) १३व्या हंगामाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली आहे.

पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी होणार तर फायनल मॅच ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. युएईमधील शाहजाह, दुबई आणि अबुधाबी या तीन ठिकाणी आयपीएलचे सामने होतील.

पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात सामन्यांचं वेळापत्रक ठरवण्यासाठीची बैठक असणार आहे. त्याशिवाय सरकारच्या अधिकृत परवानगीचीही प्रतिक्षा असेलच. यंदाच्या वर्षीसुद्धा तब्बल ५१ दिवस क्रिकेटचा हा ‘रनसंग्राम’ रंगणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे, अशी माहिती ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला दिली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टला संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.