अखेर तो दिवस आला;दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

0
325

अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालचा दिवस जाहीर केला आहे. उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यातच उत्तर पत्रिका शिक्षकांकडे पोहोचण्यास व तपासून पुन्हा मंडळाकडे विलंब झाल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडला होता. परंतु राज्य मंडळाने निकालासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असून, २९ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ऑनलाईन निकालानंतर दुसर्‍या दिवसापासून दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने http://verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी ३० जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत व छायाप्रतीसाठी ३० जुलैपासून १८ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.

कुठे पाहाल निकाल ?

mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

कसा पाहाल निकाल?

  1. दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
  2.  त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  3.  त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
  4.  Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
    तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.