बहीण- भावाच्या प्रेमळ बंधनाची महती सांगणारी राखी पौर्णिमा जवळ आलीय. रक्षाबंधन.. हा भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण आहे. भारतात बहिणीला आईप्रमाणे मानले जाते. भावा बहिणीचे नाते हे जगातील एक अनोखे नाते आहे. प्रत्येक भावाला त्याला सदैव पाठीशी घालणारी एरृक प्रेमळ बहीण हवी असते. तर प्रत्येक बहिणीला तिची सदैव पाठराखण करणारा आणि सतत तिच्या खोड्या काढणारा भाऊ हवा असतो.
आजकाल बहिणींना रक्षाबंधनाला ओवाळणी म्हणून ‘पाकीट’ चालत नाही. त्यांना ‘गिफ्ट’ द्यावं लागतं. पुन्हा ते ‘सरप्राइझ’ असावं अशी बहिणींची ‘माफक’ अपेक्षा असते. गिफ्ट घ्यायची म्हणजे नेमकं काय यापासून सुरुवात. त्यातून ते गिफ्ट बहिणीला आवडेल याची शाश्वती नाही. तर जाणून घेऊयात अशी काही गिफ्ट… हे गिफ्ट पाहिल्यावर बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल.
घड्याळ (Watch)
घड्याळाची आवड प्रत्येकीला असतेच. शिवाय तुमच्या बहीणीला जर निरनिराळ्या ट्रेंडची घड्याळ कलेक्शन करण्याची आवड असेल तर हे गिफ्ट तिला जरूर द्या. आजकाल गोल्ड, रोज गोल्ड, सिल्व्हर, गोल्ड आणि सिल्व्हर अशी विविध प्रकारची घड्याळं मिळतात.
दागिन्यांचा बॉक्स (Jewellery Box)
तुमची बहिण फॅशनेबल असेल तर तिला विविध प्रकारचे दागदागिने परिधान करणं नक्कीच आवडेल. मात्र जर तुम्हाला कोणते दागिने द्यावेत याबाबत शंका वाटत असेल तर या गिफ्टचा नक्कीच विचार करा. या राखीपौर्णिमेला तुम्ही तिला एखादा ज्वेलरी बॉक्स नक्कीच देऊ शकता. या बॉक्समध्ये एकूण नऊ खण आहेत. ज्यामध्ये तिचे विविध प्रकारचे दागदागिने छान राहू शकतील.
फोटो फ्रेम ( Photo Frame)
फोटो ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमचा आठवणी साठवलेल्या असतात. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी फोटो मदतगार ठरत असतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बहिणीचा एखादा जुना फोटो असेल जो घरच्या जुन्या फाटक्या अल्बममध्ये धूळ खात पडला असेल त्याला काढून त्याची एक फ्रेम करूनही तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता.
ट्रे्न्डी बॅग (Trendy Bag)
जर या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर हे गिफ्ट तुमचा हा प्रश्न नक्कीच सोडवू शकेल. ही हाताने विणलेली शोल्डर बॅग तुमच्या बहीणीला नक्कीच आवडेल. ही बॅग कोणत्याही लुकवर तिला कॅरी करता येईल शिवाय याच्यावर हाताने केलेलं विणकाम आणि लेदरचा लुक तुमचं गिफ्टचं निवडकौशल्य दाखवून देईल.
मोबाईल फोन (Mobile Phone)
रक्षाबंधनाला स्मार्टफोन किंवा छानसं गॅझेटही गिफ्टसाठी चांगला पर्याय असू शकतो. तुमची बहीण गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडे मोबाईलचा हट्ट करत असेल तर रक्षाबंधनाचा योगायोग सााधून एखादा चांगला मोबाईल भेट द्या. तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन मागवू शकता. सध्या मोबाईल फोनवर ऑनलाईन चांगल्या ऑफर आहेत.
इअर फोन (Ear Phone)
संगीत हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुमची बहिण देखील संगीतप्रेमी असेल तर हे गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. हेडफोनचा वापर प्रत्येकाला होतच असतो. त्यामुळे या राखीपौर्णिमेला बहीणीला हे छानसं हेडफोन देण्यास काहीच हरकत नाही.
सनग्लासेस (Sunglasses)
जरी आता पावसाळा असला तरी सनग्लासेस अथवा गॉगल नेहमीच फॅशन म्हणून वापरता येतात. त्यामुळे जर तुमची बहिण थोडी ट्रेन्डी आणि चुलबुली असेल तर तिला सनग्लासेस गिफ्ट द्या. तिच्या व्यक्तीमत्वानुसार सनग्लासेस निवडले तर ती नक्कीच खुश होईल.
कॉफी मग (Coffee Mug)
जर तुमच्या बहिणीला कॉफी पिण्याची आवड असेल तर तिला हे कॉफी मग देखील तुम्ही भेट देऊ शकता. कॉफी मग वर निरनिराळे ट्रेंडी मेसेज लिहून फोटो प्रिंट करून तुम्ही देऊ शकता. जे तुमच्या बहिणीला नक्कीच आवडतील.
नेल-पेंट (Nail Paint )
मुलींना सर्वात जास्त आवड आहे तर नेल-पेंट ची. तुम्ही नेल-पेंट चे ५ वेगवेगळ्या कलरचे शेड त्यांना गिफ्ट करा. खुश होतील.
टोस्टर (Toaster)
. जर तुमच्या बहिणीला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर तिला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. तसेच ऑफिसमध्ये जाताना घाईच्या वेळी अशा टोस्टरमध्ये टोस्ट ब्रेड अथवा सॅंडविच करण्यासाठी त्याच्या हे नक्कीच उपयोगी पडेल.
ड्रेस आणि ज्वेलरी (Dress & Jwelary)
रक्षाबंधनाला तुमच्या प्रिय बहिणीला ट्रेंडी ज्वेलरी द्या. किंवा एखादा छानसा डिजायनर ड्रेस गिफ्ट करा. तिला हे रक्षाबंधन कायम स्मरणात राहिल.
वरील साऱ्या वस्तूंना छान कलरफुल पेपर ने रॅप करा आणि एका बाॅक्स मध्ये या वस्तूंना ठेऊन एक बुके तयार करा आणि आपल्या लाडक्या बहिणीला या रक्षाबंधनला गिफ्ट करा.