किसान रेल्वे योजना; शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची संजीवनी

0
366

भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवार या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची नेआण करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात ही ट्रेन नेमकी काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार…

कुठून कुठपर्यंत?

किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.

अत्यंत वेगवान वेगाने धावणारी ही ट्रेन आठवड्यातून दोन वेळा महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर आणि बिहारहून महाराष्ट्र असा प्रवास करणार आहे.

किसान रेल्वे गाडी चालवल्यामुळे या भागात उत्पादित होणारी 50 टक्के फळझाडे व भाजीपाला वाचणार आहे. कृषी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या रेल्वेच्या धावण्यामुळे शेतकर्‍यांचा मार्ग सुकर होईल व त्यांचे उत्पादन खराब होणार नाही तसेच त्यांना योग्य भाव मिळेल. 2022 पर्यंत त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे देखील सोपे होईल.

कोणत्या स्थानकावर थांबणार? –
देवळाली ते दानापुर या स्थानकादरम्यान एक हजार ५१९ किमी ट्रेन धावेल. देवळाली स्थानकातून निघाल्यानंतर नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, मणिकपुर, प्रयागराज, पं दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.

वैशिष्ट्ये काय?
किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. १७ टनपर्यंत माल वाहून नेहण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याचं डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भळे, मासे, मांस आणि दूधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

आयसीएआर सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सीआयपीएचईटी द्वारा ९ ऑगस्ट २०१६ रोजी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार दरवर्षी सुमारे ९२ हजार खाद्यान्न वस्तू खराब होतात. यामध्ये दूध, मांस, मासे, कुक्कुटपालन, तृणधान्ये, फळे, भाज्या इत्यादी खाद्यपदार्थाविषयी बोलताना देशभरात दरवर्षी सरासरी ४०,८११ कोटी रुपयांचे खाद्यपदार्थ नष्ट होतात.

यात सर्वाधिक १२३५ कोटी रुपये किमतीचे मांस, ४३१५ कोटी रुपये किमतीचे सागरी मासे आणि ४४०९ कोटी रुपयांचे दूध आणि डाळींचे उत्पादन असून ३८७७ कोटींच्या डाळींचा समावेश आहे. वाहतुकीपासून कोल्ड स्टोरेज, पावसाचे पाणी, उष्णता आणि हंगामी नुकसान या नुकसानींमध्ये फरक आहे. आता या ट्रेनच्या धावण्यामुळे नुकसान कमी प्रमाणात होईल . अशाच प्रकारच्या आणखी गाड्या चालवण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यासाठी शेतकरी आगाऊ बुकिंग करू शकतील.