काय आहे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन

0
365

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी आरोग्यासंदर्भात नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन या नव्या योजनेची घोषणा केली. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधं दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे.

काय आहे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन

  1. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’द्वारे देशभरातील डॉक्टरांच्या सगळी माहितीसोबतच देशभरातील सगळ्या आरोग्य सेवांची माहिती एका मोबाईल अ‍ॅप वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  2. हे अ‍ॅप डाऊनलोड करून नागरिकांना स्वत:ला त्यावर रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ‘हेल्थ आयडी’ अर्थात ओळख क्रमांक प्रदान केला जाईल
  3. यामुळे प्रत्येक नागरिकावर केल्या जाणाऱ्या ट्रिटमेंट आणि टेस्टची संपूर्ण माहिती एका क्लिकवर डिजिटल पद्धतीनं उपलब्ध राहील आणि महत्त्वाचं म्हणजे याचा एक रेकॉर्ड ठेवला जाईल
  4. पर्सनल हेल्थ रेकॉर्ड- यात लोकं आपली आरोग्य विषयक माहिती अपलोड किंवा स्टोअर करु शकतील. डॉक्टर आणि लॅबविषयी माहिती तसेच सल्ला देखील यात मिळेल.
  5. हेल्थ आयडी आणि पर्सनल हेल्थ रेकॉर्ड सिस्टमवर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी आयडी दिली जाणार. यात कुणाचंही पर्सनल हेल्थ रेकॉर्ड परवानगी शिवाय पाहू शकणार नाहीत.
  6. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जाल त्यावेळी तुम्हाला सगळी कागदपत्रं आणि टेस्ट रिपोर्ट घेऊन जाण्याची आवश्यकता उरणार नाही. तुमची ‘मेडिकल हिस्ट्री’ तुमच्या ‘हेल्थ आयडी’वर उपलब्ध असेल.
  7. डॉक्टर कुठेही बसून तुमच्या हेल्थ आयडीद्वारे तुमचा सगळा मेडिकल रेकॉर्ड पाहू शकतील.

चार फिचरसह लाँच होणार ही योजना
सर्वात अगोदर हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजीटल डॉक्टर आणि हेल्थ फॅसिलिटी यामध्ये रजिस्टर केल्या जाणार आहे. त्यानंतर ई-फॉर्मेसी आणि टेलीमेडिसिन सेवेला देखील यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. याकरता गाईडलाईन्स बनवली जाणार आहे.

६ राज्यात हेल्थ मिशनची सुरुवात 

देशातील ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची सुरुवात होतेय. अंदमान निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीप आणि पॉंडेचरीचा समावेश आहे. या केंद्र शासित राज्यांनंतर देशातील दुसऱ्या राज्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात येईल.

ऍपकरता ‘या’ गाईडलाईन्स

  • नागरिकांकडे ऍपमध्ये सहभागी होण्याची इच्छा हवी
  • सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं
  • आवश्यक माहिती
  • साधी प्रक्रिया

योजने अंतर्गत काय दिलं जाणार?

  • हेल्थ आयडी
  • पर्सनल हेल्थ केअर रेकॉर्ड
  • डिजी डॉक्टर
  • हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री
  • टेलिमेडिसिन
  • ई-फार्मेसी