IPL 2020 ला मिळाला नवा प्रायोजक; ड्रीम 11 ने मिळवली आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप

0
275
  • टाटा सन्स, बायजू, पतंजली साऱ्यांना मागे टाकत मारली बाजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगचा आगामी टायटल स्पॉन्सर म्हणून ड्रीम 11 ची घोषणा केली आहे. चिनी मोबाईल कंपनी, व्हिव्होसोबत 2018 मध्ये 5 वर्षांसाठी करण्यात आलेला करार बोर्डाने नुकताच रद्द केला. त्यामुळे क्रिकेट रसिकांना आता क्रिकेटचा आश्वाद घेता येणार आहे. IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम ११ असणार आहे. ड्रीम ११ यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे.

IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक Dream 11 असणार आहे. या स्पर्धेत टाटा सन्स ( Tata Sons) बाय जूस् (Byju’s), Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. मात्र, Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. IPL 2020 च्या मुख्य प्रायोजक Dream 11 असणार आहे, असे वृत्त एएनआयने IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांच्या हवाल्याने दिले आहे. आयपीएलची लोकप्रियता पाहता, अनेक ब्रँड्सने टायटल स्पॉन्सर होण्यात रस दाखवला होता. पण, ड्रिम 11 ने बाजी मारली. 2020 च्या टुर्नामेंटसाठी करण्यात आलेला टायटल स्पॉन्सरशिपचा करार हा 5 महिन्यांपेक्षा जास्त काळाचा नसेल.

या कराराने टुर्नामेंटमधील आठही फ्रँचायझींचे नुकसान होणार आहे. कारण, मिळणाऱ्या रकमेतील 50% बीसीसीआय आपल्याजवळ ठेवतो तर उर्वरित रक्कम सर्व संघात समान वाटली जाते. 2019 मध्ये प्रत्येक संघाला 55 कोटी रुपये मिळाले होते, पण यावर्षी फक्त 27.75 कोटी रकमेवर समाधान मानावे लागेल.

१३ व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप निविदा मागवताना ‘बीसीसीआय’ने काही महत्वाच्या अटी घातल्या होत्या. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निविदा पाठवावी ही त्यातली महत्वाची अट होती. स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे ‘बीसीसीआय’ने याआधीच स्पष्ट केले होते. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल, असे भारतीय क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले होते.