यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने होणार आहे. दरवर्षी असणारा उत्साह यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत नाही. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे २२ ऑगस्ट २०२० ते १ सप्टोबंर २०२० रोजी पर्यंत पुणे शहरात राज्या सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा होणार आहे. या काळात चितळेंची ‘अवघे धरू सुपंथ’ ही जाहिरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या मालिकेने यंदाच्या गणेशोत्सवाचं एक वेगळं रुप आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं आहे.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की कार्यकर्त्यांची आणि गणेश मंडळाची लगबग सुरु होत असते. वर्गणी आली तसेच भव्य डेकोरेशन आले अशा विविध गोष्टींसाठी कार्यकर्ते काम करत असतात. मात्र यंदा मंडळातील या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोरोनाच्या काळात अनेक मंडळांनी पुढे येऊन नागरिकांना मदत केली आहे. आपल्या परिसरातील ज्येष्ठ मंडळींना या काळात कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. यामुळे या मंडळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. हीच गोष्ट चितळेंच्या या जाहिरातीतून मांडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव यांनी ही उत्तम कलाकृती साकारली आहे. या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अगदी १९ तासापर्यंत म्हणजे आतापर्यंत या व्हिडिओला ८ हजाराहून अधिक लोकांनी पाहिली आहे.
अफलातून पण भावनेला हात घालणारी आणि नात्यांचा गोडवा जपणारी ही जाहिरात सर्वांनी आवर्जून पाहावी.
उत्सवाचे सत्य रूप,
आले आपुल्या समोर!
एकमेकां सहाय्य करू
अवघे धरू सुपंथ