‘दिल्ली टू लंडन’ प्रवास करायचाय आता बस आहे ना

0
255

जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे. अशात एका ट्रॅव्हल एजन्सीने दिल्ली ते लंडन बससेवेची घोषणा केली आहे. गुरुग्राममधील एका खासगी प्रवास कंपनीने ‘बस टू लंडन’ नावाची एक ट्रिप आयोजित करत असल्याचे जाहीर केले आहे. ही ट्रिप 70 दिवसांची असेल.

18 देशांमधून प्रवास –
15 ऑगस्ट रोजी ‘ऍडव्हेंचर ओव्हरलँड’ कंपनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ‘बस टू लंडन’ या ट्रिपबाबत माहिती दिली. 70 दिवसांमध्ये 18 देशांमधून प्रवास करत ही बस लंडनमध्ये पोहोचेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 18 देशांमार्गे हा प्रवास असेल.

दिल्लीचे रहिवासी असलेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने हा प्रवास केला होता. अशाच पद्धतीने यंदा २० जणांना सोबत घेऊन बसने प्रवास करण्याचा प्लान आहे.

बस टू लंडन’च्या या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. या बसमध्ये २० प्रवाशांच्या बसण्याची सोय आहे. बसमधल्या सगळ्या सीट बिजनेस क्लासच्या असतील. दिल्ली ते लंडनच्या या प्रवासात बसमध्ये २० प्रवाशांसोबत इतर ४ जण असतील. यामध्ये एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, कंपनीचा एक केयरटेकर आणि एक गाईड यांचा समावेश असेल. १८ देशांच्या या प्रवासात गाईड बदलले जातील.

कसा असेल प्रवास? –
20,000 किलोमीटरच्या या बस प्रवासासाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे. पण, केवळ 20 प्रवासीच या बसमधून प्रवास करु शकणार आहेत. ‘बस टू लंडन’च्या या प्रवासामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. बसमधल्या सगळे सीट बिजनेस क्लासचे असतील. बसमध्ये 20 प्रवाशांशिवाय एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, ट्रिप आयोजित करणाऱ्या कंपनीचा एक केअरटेकर आणि एक गाईड असतील. 18 देशांच्या प्रवासामध्ये गाईड देखील बदलले जातील. ७० दिवसांच्या या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल. यासाठी फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलची निवड केली जाईल.

एका व्यक्तीला या प्रवासासाठी १० देशांचा व्हिसा लागणार आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून कंपनीच व्हिसाची संपूर्ण सोय करणार आहे. ‘बस टू लंडन’चा प्रवास ४ भागांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रवाशांकडे वेळ कमी असेल आणि त्यांना लंडनपर्यंतचा प्रवास करता येत नसेल, तर ते ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतील. दिल्लीपासून लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी ईएमआचा पर्यायही देण्यात आला आहे.

मे २०२१ पासून आमचा हा प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या कोरोनामुळे आम्ही फक्त नोंदणी सुरू केली आहे. भारतासोबतच अन्य देशांमधली परिस्थिती बघून प्रवास सुरु करणार आहे असेही या कंपनीने सांगितले आहे.